आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील इसुका दार्सी या गावातील शेतकरी जी.
बाजारभाव बातम्या
नाशिकमधील झेंडू उत्पादकांचा थेट विक्रीवर भर
नाशिक : व्यापाऱ्यांनी मातीमोल भावात खरेदी करून चढ्या दराने विक्री केली. ही बाब लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी स्वतः झेंडूच्या फुलांची थेट विक्री केली. त्यामुळे उत्पन्न हाती पडले आहे.
नाशिक : चालू वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेला परतीचा पाऊस व वादळामुळे झेंडूच्या लागवडी मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या. त्यामुळे अपेक्षित उत्पादन हाती आले नाही. जे हाती आले त्याची प्रतवारी नसल्याने झेंडूला मागणी व दर असूनही हाती काही पडले नाही. व्यापाऱ्यांनी मातीमोल भावात खरेदी करून चढ्या दराने विक्री केली. ही बाब लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी स्वतः झेंडूच्या फुलांची थेट विक्री केली. त्यामुळे उत्पन्न हाती पडले आहे.
दसरा बाजारात फुलांची आवक कमी झाल्याने मागणी वाढली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी चढ्या दराने विक्री केली. शेतकऱ्यांकडून ५० च्या आसपास दराने खरेदी करून १५० ते २०० रुपयांनी विक्री केली. याचा अनुभव घेऊन शेतकऱ्यांनी कमी अन माफक दराने विक्री करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या तुलनेत ग्राहकांना रास्त दराने ताजी फुले मिळाली.
शेतकऱ्यांनी स्वतः मालवाहतूक वाहनांमधून फुले शहराच्या विविध भागात रस्त्यालगत विक्रीसाठी आणली होती. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला पंचवटी परिसरात गाडगेबाबा पुलाजवळ अनेक शेतकरी दाखल झाले होते. फूल विक्रेत्यांकडे अधिक दर होता. त्यामुळे शेतकऱ्यांकडे खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर राहिला.
दरम्यान, दरात वाढ असताना अनेक उत्पादक विक्रेते दाखल झाले. त्यामुळे सकाळी १५० रुपयांपर्यंत असलेले दर दुपारनंतर १०० रुपयांपर्यंत खाली आल्याचे पाहायला मिळाले. मागणी जास्त व आवक कमी आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी ८० ते १२० रुपयांनी ठोक खरेदी केली. मात्र, दुपारनंतर मागणी मंदावल्याने काही विक्रेत्यांना तोटाही सहन करावा लागला.
शेतकऱ्यांकडून कमी दराने फुले घेऊन व्यापारी चढ्या दराने विक्री करतात. त्यामुळे जे कष्ट करतात, त्यांनाच दोन पैसे मिळावे, यासाठी शेतकऱ्यांकडून खरेदी केली. रास्त दराने फुले मिळाली.
- सचिन जाधव, ग्राहक, पंचवटी, नाशिक.
सकाळी लवकर येऊन थेट विक्री पद्धतीत १५० रुपये सरासरी दराने विक्री झाली. दुपारनंतर आवक वाढल्याने दर १०० रुपयांपर्यंत आले. मात्र थेट विक्री केल्याने दोन पैसे मिळाल्याचा आनंद आहे.
- रवींद्र गोरडे, झेंडू उत्पादक, झेडले झुंगे, ता. निफाड
- 1 of 65
- ››