सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला) येथील शेतकऱ्यांनी आंबा, काजू या मुख्य पिकांन
बाजारभाव बातम्या
जळगावात झेंडूच्या बाजारात तेजी
जळगाव : झेंडू फुलांची दिवाळीनिमित्त मोठी मागणी आहे. बाजारातील पुरवठादेखील वाढला असून, चांगला उठाव शनिवारी (ता.१४) झेंडु फुलांना होता. यामुळे दरातही चांगली वाढ झाली.
जळगाव : झेंडू फुलांची दिवाळीनिमित्त मोठी मागणी आहे. बाजारातील पुरवठादेखील वाढला असून, चांगला उठाव शनिवारी (ता.१४) झेंडु फुलांना होता. यामुळे दरातही चांगली वाढ झाली. वल्लभदास वालजी व्यापारी संकुलातील बाजारात झेंडूला किमान ३०, कमाल ४० व सरासरी ३५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला.
पिवळा, केशरी झेंडू लक्ष वेधून घेत होता. आवक जळगाव, पाचोरा, एरंडोल, जालना, धुळे, औरंगाबादमधील कन्नड, बुलडाणा आदी भागातून झाली. झेंडूची शनिवारी सुमारे २० क्विंटल आवक झाली.
दोन्ही प्रकारच्या झेंडूला उठाव होता. काही शेतकऱ्यांकडून ग्राहकांनी सकाळीच या घाऊक बाजारात ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो या दरात झेंडूची खरेदी केली. खरेदीला दिवाळीला प्रतिसाद मिळेल, अशी स्थिती नव्हती. परंतु, कोरोनाचे कमी होणारे संकट व शासनाकडून खुला झालेला बाजार, यामुळे खरेदीला प्रतिसाद मिळाला.
जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये झेंडूचे मोठे नुकसान झाले. कारण, विक्रीच होत नव्हती. पणन व्यवस्थेला फटका बसला. वल्लभदास वालजी व्यापारी संकुलातील बाजार दसरा सणापासून सुरू झाला. हा बाजार फुलांसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या आठवड्यात झेंडूची आवक प्रतिदिन पाच ते सहा क्विंटल होती.
या आठवड्यात गुरुवारपासून (ता.१२) आवक वाढली. गेले दोन दिवस प्रतिदिन २० क्विंटल आवक झाली. जळगावनजीकच्या शिरसोली, आसोदा, भुसावळातील कुऱ्हेपानाचे, तळवेल आदी भागातून फुलांची आवक झाली. सकाळी लवकर लिलाव आटोपले. किरकोळ बाजारात झेंडूची विक्री ५० ते ६० रुपये प्रतिकिलो या दरात झाली. घरोघरी झेंडू फुलांची मागणी असल्याने बाजारात दिवाळीला जणू चैतन्य पसरले.
झेंडू फुलांचे लिलाव लवकर आटोपले. दर किमान ३० रुपये प्रतिकिलो मिळाला. कोलकता प्रकारच्या झेंडूचा अधिकचा उठाव होता.
- नरेंद्र बारी, शेतकरी, जळगाव
- 1 of 65
- ››