Agriculture news in marathi; marigold plantation in Chandwad taluka for Dussehra, Diwali | Agrowon

दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात झेंडूची लागवड

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा, दिवाळी सणांचा विचार करून झेंडूचे पीक घेतात. कल्याण, दादर यांसह नाशिक शहरामध्ये झेंडूच्या फुलाला चांगली मागणी असल्याने शेतकरी झेंडूची शेती फुलवू लागले आहेत. त्यामुळे कधी ही न होणारे झेंडूचे क्षेत्र या भागात वाढत आहे. 

नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा, दिवाळी सणांचा विचार करून झेंडूचे पीक घेतात. कल्याण, दादर यांसह नाशिक शहरामध्ये झेंडूच्या फुलाला चांगली मागणी असल्याने शेतकरी झेंडूची शेती फुलवू लागले आहेत. त्यामुळे कधी ही न होणारे झेंडूचे क्षेत्र या भागात वाढत आहे. 

चांदवड तालुक्यात आजमितीस निमगव्हाण, हिवरखेडा, पाटदशेंबे गावांमध्ये मोठ्या प्रमाणात झेंडू लागवड केली जात आहे. योग्य नियोजन व योग्य भाव हे झेंडू फुलशेतीच्या लागवडीचे गमक असून झेंडू लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. चालू वर्षी १०० एकर हून अधिक क्षेत्रावर लागवड झाल्याचे शेतकरी सांगतात. पूर्वी झेंडू शेतीविषयी माहिती कमी असल्याने व चांगली बाजारपेठ मिळत नसल्याने शेतकरी झेंडू लागवडीस अनुकूल नसत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून झेंडू शेतीविषयी उपलब्ध होणारी माहिती, दर्जेदार उत्पादन, योग्य भाव यांमुळे शेतकऱ्यांचा झेंडू शेतीकडे कल वाढला आहे. खत व पाणी व्यवस्थापन करून झेंडू पीक घेतले जाते. 

व्यापाऱ्यांकडून झेंडूला मागणी मोठ्या प्रमाणावर असते. अनेक व्यापारी येथे दाखल होत असतात. त्यामुळे हे पीक शेतकऱ्यांना अधिक लाभ देणारे असते. श्रावण महिन्याच्या सुरवातीस लागवड केली आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झेंडूची रोपे तयार करून लागवड केली जाते. यासाठी पिवळा व केसरी रंगाच्या वाणांची निवड केली जाते. महाराष्ट्रात दादर, कल्याण, वाशी यांसह गुजरातमधल्या अहमदाबाद येथेही झेंडूला मोठी बाजारपेठ असून तालुक्यातील बहुसंख्य झेंडू उत्पादक शेतकरी आपला माल याठिकाणी विक्रीस नेत आहेत. प्रतिकिलो असलेला या फुलांचा भाव नवरात्रीच्या व दिवाळीच्या काळात ९० ते १०० रुपयांपर्यंत पोचत असल्याचे शेतकरी सांगतात. 

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागवड केल्यास नवरात्र-दसरा व दिवाळीत फुले काढणीस येतात, या कालावधीतच झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळतो. आता उत्पादन व विक्री आम्हीच करत असल्याने दोन पैसे अधिक मिळतात. 
- शैलेश जाधव, झेंडू उत्पादक शेतकरी, निमगव्हाण, ता. चांदवड


इतर ताज्या घडामोडी
जंगलातील वणव्यांचाही वटवाघळांना होतो...वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील...
जालना जिल्ह्यात रब्बी सिंचनाची वाट अवघडचजालना :  जायकवाडी प्रकल्पावरून...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळी...नांदेड : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे...
आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब...आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड...
गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ...कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ४०...बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी...
अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्याअमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण...
नाशिक जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन...नाशिक : जिल्ह्यात सन १९९५ ते २००० या कालावधीत...
सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार...सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली...
प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक...
प्रतिकूल हवामानाचा नगर जिल्ह्यातील गहू...नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
चंद्रपूर जिल्ह्यात ११ महिन्यांत ५०...चंद्रपूर  ः नापिकी, कर्जबाजारीपणा यातून...
हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण,...पुणे  ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी...
बुलडाणा जिल्ह्याच्या भूजलपातळीत १.३९...बुलडाणा ः मागील काही वर्षांपासून जिल्हा सातत्याने...
पुण्यात १७ जानेवारीपासून पुष्प...पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ...
नवी दिल्लीतील प्रदर्शनात जैविक खते,...पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस...कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील...
द्राक्ष उत्पादकांची दोन कोटींची फसवणूक नाशिक: दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा...
उशिरा गहू पेरणीसाठी जाती व नियोजनया वर्षी परतीच्या पावसाने अधिक काळ मुक्काम...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, बटाट्याचे दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...