Agriculture news in marathi Marigold prices continued to rise on Diwali | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात दिवाळी दिवशीही अनुभवला झेंडूच्या तेजीचा माहोल

टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

जिल्ह्यात यंदा झेंडू उत्पादकांना दिवाळी सुखकर गेली आहे. लक्ष्मी पुजनाच्या दिवशीही सायंकाळपर्यंत झेंडूचे दर चढेच राहिल्याने उत्पादकांत समाधान होते. 

कोल्हापूर  : जिल्ह्यात यंदा झेंडू उत्पादकांना दिवाळी सुखकर गेली आहे. लक्ष्मी पुजनाच्या दिवशीही सायंकाळपर्यंत झेंडूचे दर चढेच राहिल्याने उत्पादकांत समाधान होते. 

ऑक्टोबरच्या पावसामुळे यंदा झेंडू उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्‍वभूमीवर यंदा झेंडूच्या उत्पादनात घट पहावयास मिळाली. दिवाळी अगोदर चार दिवसांपासूनच झेंडूच्या दरात तेजीचा माहोल राहिला. दर वाढल्याने शेतकऱ्यांनी शक्‍य होतील तितके झेंडूची काढणी केली. मोठ्या आकाराच्या झेंडू बरोबरच लहान आकाराच्या झेंडूलाही स्थानिक बाजारात मागणी होती. 

दिवाळीच्या पूर्वसंध्येला अनेक शेतकऱ्यांच्या प्लॉटवरून व्यापाऱ्यांनी दीडशे रुपये किलोपर्यंतच्या दराने झेंडूची खरेदी केली. बाजारपेठेत दिवाळीच्या दुपारपर्यंत झेंडूचा दर दोनशे रुपये किलोपर्यंत वाढला. लहान आकाराच्या झेंडूलाही किलोस शंभर रुपयापर्यंत दर होता. अनेक शेतकऱ्यांनी महामार्गाच्या कडेला तात्पुरते स्टॉल मांडूनही झेंडूची विक्री केली.

प्रत्येक वर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपारपर्यंतच समाधानकारक दर असतो. सायंकाळी मात्र किलोला दहा वीस रुपयापर्यंत दर घसरतात. यंदा मात्र उत्पादनच कमी असल्याने झेंडूचे दर फारसे कमी झाले नाहीत. दोनशे रुपयांचा दर शंभर रुपये असला तरी मिळणारा दरही समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही. पाडव्यालाही काही प्रमाणात झेंडूची मागणी असल्याने झेंडूची मागणी कायम होती. दर कमी झाले तरी उत्पादन नसल्याने दिवाळी होईपर्यंत तरी झेंडूचे दर नीचांकी पातळीवर जाणे शक्‍य नसल्याचे व्यापारी प्रतिनिधींनी सांगितले.

इतर बाजारभाव बातम्या
राज्यात मेथी २५० ते ३००० रुपये शेकडासोलापुरात प्रतिशेकडा ३०० ते ७०० रुपये सोलापूर...
नाशिक बाजारात कारल्याचे दर टिकूननाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाला आवक घटली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात मका दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
औरंगाबादमध्ये मोसंबीला सर्वसाधारण ३०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी...कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये...
राज्यात बटाटा १००० ते २६०० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १००० ते १२५० रुपये...
नाशिकमध्ये भेंडीला सर्वसाधारण २९१० रुपयेनाशिक : ‘‘येथील बाजार समितीमध्ये भेंडीची आवक ५२...
नाशिकमध्ये कांद्याच्या दरात सुधारणानाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरमध्ये तूर ४००० ते ५५०० रुपये...नगर ः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात कांदा दरात सुधारणा सुरूच आहे. दर...
औरंगाबादमध्ये मक्यासह तुरीचे दर स्थिरजालना : येथील बाजार समितीमध्ये गत आठवड्यात ५ ते ९...
पुण्यात भोगीनिमित्त गाजर, मटारला मागणीपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत द्राक्षांना क्विंटलला ६०००...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९...
परभणीत शेवग्याला क्विंटलला ५००० ते ८०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
आंबिया संत्र्याला मिळाला २२ हजार...नागपूर : बाजारात संत्र्याचे दर गडगडले असतानाच...
राज्यात कांदा २०० ते ३५०० रुपयेसोलापुरात प्रतिक्विंटला २०० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये दोडक्याची आवक सर्वसाधारण;...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात मक्याची आवक कमीजळगावः खानदेशात प्रमुख बाजार समित्यांमध्ये...