Agriculture News in Marathi Marigold, Shewanti flowers are in high demand in Pune | Agrowon

झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी वाढली

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021

फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना, झेंडू आणि शेवंतीच्या फुलांची मागणी वाढू लागली आहे. मात्र राज्याच्या विविध भागांत झालेल्या पावसामुळे झेंडूची फुले भिजल्याने नुकसान झाले आहे.

पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना, झेंडू आणि शेवंतीच्या फुलांची मागणी वाढू लागली आहे. मात्र राज्याच्या विविध भागांत झालेल्या पावसामुळे झेंडूची फुले भिजल्याने नुकसान झाले आहे. परिणामी, आवक संतुलित राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. मंगळवारी (ता.१२) झेंडूला प्रति किलोला ५० ते ९०, तर शेवंतीला ८० ते १५० रुपये 
दर होता. 

दसऱ्या निमित्तच्या फुलांची आवक आणि बाजार भावाबाबत पुणे बाजार समितीमधील फूल व्यापारी सागर भोसले म्हणाले, ‘‘नवरात्रात मंदिरे खुली झाल्यामुळे फुलांची मागणी आणि दर वाढले आहेत. गणेशोत्सवानंतर फुलांचे दर चांगले आहेत. मात्र गेल्या आठवड्यात राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील झेंडूच्या फुलांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे दसऱ्यानिमित्ताने होणारी आवक संतुलित राहील असा अंदाज आहे. तर मागणी वाढलेली राहील आणि दर ९० ते १०० रुपयांपर्यंत राहील असा अंदाज आहे.’’

मंगळवारी (ता.,१२) विविध फुलांचे दर झेंडू - ५०-९०, गुलछडी १२०-२००, बिजली ५०-१००, ॲस्टर (पाच गड्ड्यांचे भाव) - १०-२५, सुटा प्रति किलो - ५०-१००, शेवंती ८०-१५०, जुई १००-१५००, चमेली १३००, गुलाब गड्डी -२--३०, लिली बंडल (५० काडी) - २०-३०, जरबेरा २०-४०, कार्नेशन - ८०-१५०.


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात भाजीपाल्याचे दर तेजीत पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात टोमॅटो ५०० ते ५००० रुपये क्विंटलनांदेडमध्ये क्विंटलला ३००० ते ५००० रुपये...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...
नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याची मागणी...नाशिक: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात हिरव्या मिरची, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात रताळे, गुळाची आवक सुरुकोल्हापूर : येथील बाजार समितीत नवरात्रीच्या...
पुण्यात टोमॅटो, वांगी, शेवगा तेजीत पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात मोसंबी ८०० ते ४६०० रुपये...औरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते ३००० रुपये...
नाशिकमध्ये लवंगी मिरची सरासरी २१५०नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
तूर दरात ५० ते १०० रुपयांची सुधारणापुणे : मागणी वाढल्याने देशभरातील बाजार...
केळीला १२२० रुपये प्रतिक्विंटल दरजळगाव : केळी दरात गेल्या दोन दिवसात किरकोळ घसरण...
पुण्यात पालेभाज्यांची आवक स्थिर पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बऱ्हाणपूरला केळीला हंगामातील सर्वाधिक दरजळगाव :  खानदेशात केळीचे दर टिकून आहेत. मध्य...
राज्यात सीताफळ १००० ते १४००० रुपये...सोलापुरात प्रतिक्विंटलला २००० ते ५००० रुपये...
नगरमध्ये हिरवी मिरची, भेंडी, दोडक्याला...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात पालेभाज्यांच्या दरात वाढ पुणे : खरीप हंगामानंतर भाजीपाल्याचे रब्बीचा हंगाम...
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७०० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटलला ४५०० ते ५५०० रुपये...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...