वंचितच्या ‘बंद’चा बाजारपेठांवर परिणाम

वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्‍या बंदमुळे बाजारपेठ बंद
वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्‍या बंदमुळे बाजारपेठ बंद

अकोला  ः सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (एनआरसी) विरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी (ता. २४) पुकारलेल्‍या बंदचा ठिकठिकाणी परिणाम जाणवला. अकोल्यातील भाजीपाल्याची बाजारपेठ बंद होती. यामुळे दररोज होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली.  ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. हा बंद लक्षात घेता अकोल्यातील भाजीबाजारातील व्यापाऱ्यांनी समर्थन देत बंद पाळला. यामुळे कुठलीही आवक व खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ शकले नव्हते. या बाजारपेठेत दररोज टोमॅटो, मिरची, पालेभाज्यांची जिल्ह्यासह राज्याच्या इतर भागांतून आवक होत असते. बंदमुळे ही आवक पूर्णतः ठप्प होती. बंदमुळे भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. ग्राहकांना महाग दराने काही ठिकाणी भाज्यांची खरेदी करावी लागली. बंदमुळे एसटीची वाहतूकही मंदावली होती. एसटी प्रशासनाने लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द केल्या होत्या. अकोला शहरात तसेच ग्रामीण भागातील बहुतांश शाळांनीही सुटी जाहीर केली होती. प्रतिष्ठाने बंद राहल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. दुपारनंतर बंदची तीव्रता कमी होत गेली.  अत्यावश्‍यक सेवा सुरू  अत्यावश्‍यक सेवा म्हणून औषध प्रतिष्ठान या बंदमधून वगळ्यात आले होते. शहरातील आरोग्य सेवा, मेडिकलची दुकाने सुरू होती.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com