सांगली बाजार समितीवर प्रशासक की मुदतवाढ

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदतवाढ २६ फेब्रुवारीला संपली आहे. मुदतवाढ मिळण्यासाठी संचालक मंडळाने पणन विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
बाजार समितीवर प्रशासक की मुदतवाढ On the market committee Administrator's extension
बाजार समितीवर प्रशासक की मुदतवाढ On the market committee Administrator's extension

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदतवाढ २६ फेब्रुवारीला संपली आहे. मुदतवाढ मिळण्यासाठी संचालक मंडळाने पणन विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. तर दुसरीकडे शेतकरी संघटनेचे संजय कोले यांनी प्रशासक नियुक्तीची मागणी केली आहे. त्यामुळे बाजार समितीवर प्रशासक की मुदतवाढ याकडे लक्ष लागले आहे.

 गतवर्षी बाजार समिती संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे २७ ऑगस्ट रोजी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. संचालकांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर मुदतवाढ देण्याचे आदेश दिले. सहा महिन्यांची मुदतवाढ संपल्यानंतर सभापती दिनकर पाटील यांच्यासह काही संचालकांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर मुदतवाढीचे आदेश पणन विभागाने दिले. २६ फेब्रुवारीपर्यंत ही मुदतवाढ होती. तत्पूर्वी राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुकांना सुरवातीला ३१ मार्च २०२१ पर्यंत स्थगिती दिली. ३१ मार्चपर्यंतची स्थगिती संपल्यानंतर काय होणार? याकडे लक्ष लागले असताना पुन्हा एकदा सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली. 

एकीकडे सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्या असल्यामुळे बाजार समितीचे मतदार असलेल्या विकास सोसायट्यांच्या निवडणुकाही पुढे गेल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक घेणे सध्या तरी शक्‍य नाही. २७ फेब्रुवारीला बाजार समिती संचालकांची मुदतवाढ संपण्यापूर्वी संचालक मंडळाने मुदतवाढीची मागणी केली आहे. तर शेतकरी संघटना सहकार आघाडीचे संजय कोले यांनी संचालक मंडळाला मुदतवाढ न देता प्रशासक नियुक्तीची मागणी केली आहे. त्यामुळे बाजार समितीवर प्रशासक की संचालक मंडळाला मुदतवाढ याकडे लक्ष लागले आहे. 

बाजार समिती संचालक मंडळाने राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मुदतवाढीची लॉटरी लागली. त्यानंतर पुन्हा एकदा मुदतवाढीची मागणी केली आहे. त्यामुळे संचालक मंडळाला मुदतवाढीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. मुदतवाढीचा प्रस्ताव सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गेला आहे. चार दिवसांत त्यावर निर्णय होईल, असा विश्‍वास संचालक मंडळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com