महाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध व्यवसायाचा रुळावरून घसरलेला गाडा संकटाच्या खाईतच जात आ
ताज्या घडामोडी
पुणे बाजार समितीतील बेकायदा हमाली, तोलाईची वसुली नाहीच
पुणे ः पुणे बाजार समितीमधील डाळिंब यार्डातील अडत्यांनी शेतकऱ्यांच्या हिशोब पट्टीतून नियमांपेक्षा अधिक हमाली, तोलाई घेतल्याचे जानेवारी महिन्यात निष्पन्न झाले होते. ११ महिन्यांनंतरही सुमारे १५ कोटींची ही रक्कम अद्याप अडत्यांकडून वसूल करून शेतकऱ्यांना परत मिळालेली नाही. याबाबत बाजार समितीने चौकशी समिती स्थापन करून अहवालदेखील सादर केला होता. मात्र अडत्यांवरील जबाबदारी अद्याप निश्चित न झाल्याने याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

बाजार समितीमधील डाळिंब विभागातील चार अडत्यांनी शेतकऱ्यांकडून डाळिंबाची वर्गवारी आणि हाताळणीच्या नावाखाली हमाली आणि तोलाईची नियमबाह्य वसुली केल्याचा प्रकार उघड झाला होता. ही रक्कम सुमारे १५ कोटींच्या आसपास असल्याचेही सिद्ध झाले होते. याबाबत बाजार समिती प्रशासनाने या अडत्यांची दफ्तरे, हिशोब पट्ट्या ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यासाठी सनदी लेखापालांची नियुक्ती करून चौकशी करण्यात आली होती. मात्र लेखापालांच्या चौकशीचा अहवाल अद्याप उघड करण्यात आलेला नाही; तर कोणत्या अडत्यांनी किती रक्कम जास्त वसूल केली, याबाबतची निश्चिती करण्यात आलेली नाही. याबाबत बाजार समिती प्रशासक बी. जे. देशमुख यांनी चौकशी अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच निश्चिती करून रक्कम वसूल केली जाईल, असे सांगण्यात आले.
- 1 of 583
- ››