जळगाव बाजार समिती सभापतिपदी कैलास चौधरी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी शिवसेना नेते सुरेश जैन समर्थक कैलास छगन चौधरी यांची सोमवारी (ता. २७) बिनविरोध निवड झाली. 

जळगाव बाजार समिती जिल्ह्यात महत्त्वाची मानली जाते. सभापती लक्ष्मण पाटील यांनी पायउतार केल्यानंतर सभापतिपदाच्या निवडीसाठी जोरदार हालचाली सुरू होत्या. शिवसेना व भाजप नेत्यांनी निष्ठावंत व निवडणुकांमध्ये पक्षाला मते मिळवून देणाऱ्या नेत्याची निवड करण्यासंबंधी भूमिका यापूर्वीच घेतली होती. या निवडीपूर्वी काही संचालक सहलीला गेले होते. ते रविवारी (ता. २६) सहलीवरून परतले. सोमवारी दुपारी विशेष सभा सुरू झाली, तोपर्यंत सभापतिपदासाठी अर्ज कुणी भरायचा, याचा निर्णय झालेला नव्हता. सभा सुरू असताना नेते सुरेश जैन यांनी इतर संचालकांशी मोबाईलवरून संपर्क साधून कैलास चौधरी यांचा अर्ज भरा व बिनविरोध निवड करा असा आदेश दिला. 

अर्ज भरण्यासाठी १२ ते १२.१५ अशी १५ मिनिटे वेळ देण्यात आली होती. चौधरी यांच्या व्यतिरिक्त कुणीही अर्ज भरला नाही. यानंतर चौधरी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जळगावच्या सहायक निबंधकांनी (सहकारी संस्था) कामकाज पाहिले. या विशेष सभेला सर्व संचालक उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com