agriculture news in marathi, market committee election preparation starts on papers, mumbai, maharashtra | Agrowon

मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘कागदोपत्री’ तयारी सुरू

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी २०१४ मध्ये बरखास्त करण्यात आलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची ‘कागदोपत्री’ तयारी सुरू करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने ही तयारी सुरू असून, नुकतीच महाधिवक्‍त्यांच्या अध्यक्षतेखील कालबद्ध कार्यक्रम निश्‍चिती आणि अंमलबजावणीबाबत बैठक झाली. येत्या गुरुवारी (ता. २२) पुन्हा मतदारयादीच्या रचनेबाबत बैठक होणार आहे. 

पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी २०१४ मध्ये बरखास्त करण्यात आलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची ‘कागदोपत्री’ तयारी सुरू करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने ही तयारी सुरू असून, नुकतीच महाधिवक्‍त्यांच्या अध्यक्षतेखील कालबद्ध कार्यक्रम निश्‍चिती आणि अंमलबजावणीबाबत बैठक झाली. येत्या गुरुवारी (ता. २२) पुन्हा मतदारयादीच्या रचनेबाबत बैठक होणार आहे. 

देशातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या काही बाजार समित्यांमध्ये मुंबई बाजार समितीचा समावेश आहे. या बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची स्पर्धा असते. या बाजार समितीवर नेहेमीच काँग्रेस, राष्‍ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. बाजार समितीच्या संचालकपदावर मोठ्या संख्येने आमदार, खासदारांनी काम केले आहे. २०१४ मध्ये चटई निर्देशांक घोटाळ्यासह कोट्यवधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आले होते. या गैरव्यवहारांची दखल घेत तत्कालीन पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर या बाजार समितीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बाजार समितीची निवडणूक घेण्याबाबत न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या, या याचिकांची दखल घेत उच्च न्यायालयाने सरकारला निवडणूक घेण्याबाबतच्या सूचना केल्या. यानंतर महाधिवक्त्याच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीची कार्यक्रम निश्‍चिती आणि अंमलबजावणीबाबत चर्चा झाली. गुरुवारी पुन्हा बैठक होणार असून, त्या अगोदर निवडणूक निर्णय अधिकारी आणि ठाण्याच्या जिल्हाधिकारी अपर्ण सोमाणी - आरोलकर यांनी सोमवारी (ता. १९) मतदारयादी निश्‍चितीबाबत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला पणन संचालक, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव, बाजार समितीचे प्रशासक किंवा सचिव आणि जिल्हा उपनिबंधकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

निवडणूक नाहीच? 
न्यायालयाच्या आदेशानुसार जरी निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली असली, तरी केंद्र शासनाच्या नवीन मॉडेल ॲक्टनुसार पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर या बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्यात येणार आहे. याबाबतचे विधेयक राज्यपालांच्या सहीने मंजूर देखील झाले होते. या विधेयकाला दुरुस्तीसाठी स्थगिती देण्यात आली असून, नवीन सरकार आल्यानंतर या विधेयकाला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर या बाजार समित्या निवडणूक प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्याची निवडणुकीची तयारी ही केवळ वेळ मारून नेण्यासाठीची प्रक्रिया असल्याचे बोलले जात आहे. 


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...