agriculture news in marathi, market committee expansion, jalgaon,maharashtra | Agrowon

जळगाव बाजार समिती विस्ताराच्या हालचाली

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017
जळगाव बाजार समितीचे स्थलांतर करण्यासंबंधी माझ्या काळात २९ एकर जमीन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मदतीने महामार्गालगत उपलब्ध करून घेतली. आता पुढील कार्यवाही ही नवीन पदाधिकारी करतील. नवीन बाजार समितीसाठी पहिल्याच टप्प्यात जवळपास २३ कोटी निधी लागेल. 
- प्रकाश नारखेडे, माजी सभापती, जळगाव बाजार समिती.
जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा विस्तार व स्थलांतराच्या हालचाली सुरू आहेत. त्यासंबंधी जळगाव शहरालगतच महामार्गानजीक दूरदर्शन टॉवरपासून पुढे थोड्या अंतरावर २९ एकर जमीन उपलब्ध झाली आहे. या जमिनीची मोजणी झाली आहे. जमीन खरेदीसाठी जवळपास २३ कोटी निधी हवा असून, बाजार समिती हा निधी बॅंका व इतर संस्थांकडून वित्तसाह्य घेऊन उभारण्यासंबंधी कार्यवाही करीत आहे.
 
बाजार समिती ही औद्योगिक वसाहतीनजीक आहे. फळे व भाजीपाला मार्केट मिळून जवळपास ३० एकरात ही बाजार समिती आहे. पण अलीकडे ती वाढत्या नागरीककरणामुळे शहरात आली आहे. बैलगाडी, ट्रॅक्‍टर सायंकाळी व सकाळी बाजार समितीत नेताना अनेक अडथळे शेतकऱ्यांना पार करावे लागतात.
 
बाजार समितीनजीक जळगाव-औरंगाबाद राज्यमार्ग आणि नागपूर महामार्गदेखील आहे. त्यावरून जाणे म्हणजे जीव धोक्‍यात घालण्याचे झाले आहे. यामुळे ही बाजार समिती स्थलांतरासंबंधी मागील दीड वर्षापासून हालचाली सुरू आहेत. त्यासाठी १२ शेतकऱ्यांनी जमीन देण्याची तयारी दाखविल्याने तिची मोजणी दोन महिन्यांपूर्वीच झाली. खूणा गाडल्या आहेत. हे शेतकरी नशिराबाद, आसोदा व जुन्या जळगावमधील आहेत. ही २९ एकर जमीन आहे. 
 
नवीन बाजार समिती उभारण्यासंबंधी बाजार समितीकडे निधी नाही. १०३ कर्मचारी बाजार समितीत आहे. वर्षाला चार कोटी ८५ लाख उत्पन्न आहे. तर खर्च साडेचार कोटी आहे. महिन्याला वेतनासाठी ३३ लाख रुपये लागतात. मागील दोन वर्षांत दीड कोटी उत्पन्न वर्षाला वाढले. निधी, वित्तीय गरजांसाठी जळगाव ग्रामीणचे आमदार तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा काही संचालक, शेतकरी यांनी व्यक्त केली आहे. 
 
प्रस्तावीत नवीन बाजार समितीमध्ये फळे, भाजीपाला व धान्य मार्केट उभारणीचा मानस आहे. जे अडतदार, विक्रेते यायला तयार असतील त्यांना २९ वर्षांच्या कराराने दुकानांसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. जागा, यार्डाचा विकास अडतदारांनी करायचा. बाजार समिती या जागेला कुंपण भिंत, गटारी, पाणी, वीज, पक्के रस्ते, कार्यालय आदी प्राथमिक सुविधा करून देईल, असा प्रस्ताव आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. 

इतर बातम्या
वनौषधी लागवडीसाठी निधी असूनही अनास्था पुणे: आयुर्वेदात प्रगत असल्याची जगभर शेखी...
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करा...सोलापूर : ‘‘उजनीच्या पाण्याचा विषय हा...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...