बाजार समितीसाठी हस्ते उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुभा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर : बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवाराला संबंधित मतदारसंघासाठी आरक्षणनिहाय अर्ज करावे लागणार आहेत. मतदार यादीत नाव असलेल्या सूचक व अनुमोदकांद्वारे हस्ते उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करता येईल, अशी तरतूद असल्याची माहिती सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दिली. त्यामुळे आता गुन्हा दाखल झालेले बहुतांशी उमेदवार बाजार समितीच्या रणांगणात उतरण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

बाजार समितीच्या तत्कालीन सभापती व संचालकांविरोधात दाखल झालेला गुन्हा राजकीय द्वेषापोटी करण्यात आला असून, बाजार समितीवर भाजपची सत्ता यावी, यासाठी ही कारवाई निवडणुकीच्या तोंडावर केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रतिष्ठेच्या लढाईत कोण बाजी मारणार, कोणता पक्ष कोणासमवेत जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सोलापूर बाजार समितीच्या तत्कालीन सभापती व संचालकांवर बाजार समितीत अनियमितता केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. ते आता अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असल्याचे समजते, परंतु ते व्यक्‍तिश: अर्ज करू शकत नसले तरीही मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या अन्य मतदारांमार्फत (सूचक व अनुमोदक) अर्ज भरू शकतात. त्यामुळे तत्कालीन संचालकदेखील निवडणुकीसाठी अर्ज करणार असल्याचे बोलले जात आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com