जळगाव बाजार समितीच्या सभापतींची उद्या निवड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव  ः जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या जळगाव बाजार समितीत येत्या सोमवारी (ता. २७) सभापतिपदाची निवड होणार असून, या निवडीपूर्वी काही संचालक सहलीला गेले आहेत. सभापतिपद शिवसेना समर्थकास मिळेल, हे निश्‍चित झाले असून, त्यासाठी अनिल भोळे व कैलास चौधरी यांच्यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे संकेत आहेत. 

अनिल भोळे हे शिवसेनेचे सक्रिय सदस्य आहे. तर कैलास चौधरी हे शिवसेना नेते सुरेश जैन यांचे निकटवर्तीय आहे. बाजार समितीत सुरवातीला भाजप समर्थक प्रकाश नारखेडे यांना सभापतिपदाची संधी मिळाली होती. त्यांनी पायउतार केल्यानंतर स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून निवडून लढविणारे लक्ष्मण पाटील यांना सभापतिपदाची संधी मिळाली. सुमारे दीड वर्षे ते सभापती होते. आता शिवसेना समर्थकांना सभापतिपद मिळेल, असे सांगितले जात आहे. महायुतीचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार उन्मेष पाटील यांना ज्या संचालकाने आपल्या भागातून अधिकाधिक मते मिळवून दिली, त्यास संधी देण्याचे संकेत सेना-भाजपच्या नेत्यांनी सुरवातीला दिले होते. यानुसार आता चौधरी यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडेल की, भोळे यांना संधी मिळेल या चर्चेला उधाण आले आहे. सभापती निवडीसाठी २७ रोजी सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या सभागृहात विशेष सभा होणार आहे. सहायक निबंधक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करतील. हात उंच करून मतदान करता येईल. निवड मात्र बिनविरोध होईल, अशी माहिती मिळाली आहे. 

यांनी टाळली सहल सभापती निवडीपूर्वी काही संचालक सहलीला गेले आहेत. परंतु लक्ष्मण पाटील, प्रशांत पाटील, प्रभाकर पवार, प्रभाकर सोनवणे, भरत बोरसे, नितीन बेहेडे, शशिकांत बियाणी आदी संचालक विविध कारणांमुळे सहलीला गेलेले नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com