बाजार समित्या सलग तीन दिवस बंद ठेवू नका

‘ॲग्रोवन’ने शेतकऱ्यांच्या अडचणींना शनिवारी (ता. ३०) वाचा फोडल्यानंतर जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे यांनी तत्काळ दखल घेतबाजार समित्यांना पत्र काढून सलग तीन किंवा त्यापेक्षा जास्त दिवस कामकाज बंद ठेवता येणार नाही, असे आदेश दिले आहेत.
Market committees should not be closed for three days in a row
Market committees should not be closed for three days in a row

नाशिक : दिवाळीच्या अगोदर आठवडाभर जिल्ह्यातील बाजार समित्यांनी ८ तारखेपर्यंत कामकाज बंद राहणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली होती. त्यावर ‘ॲग्रोवन’ने शेतकऱ्यांच्या अडचणींना शनिवारी (ता. ३०) वाचा फोडल्यानंतर जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे यांनी तत्काळ दखल घेत बाजार समित्यांना पत्र काढून सलग तीन किंवा त्यापेक्षा जास्त दिवस कामकाज बंद ठेवता येणार नाही, असे आदेश दिले आहेत. या बाबत कार्यवाही न झाल्यास संचालक मंडळ व सचिवांविरोधात कारवाईचा इशारा ही दिला आहे.  

पणन संचालक सतीश सोनी यांनी ६ एप्रिल रोजी परिपत्रक काढून सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बाजार समित्यांमध्ये शेतीमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवता येणार नाही, अशा सूचना केल्या होत्या. यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना अंमलबजावणी करावी, असे सूचित करूनही बाजार समित्यांकडून सुट्ट्यांची घोषणा करून सूचनेला केराची टोपली दाखवली. ॲग्रोवनने हा प्रकार उजेडात आणत दिवाळीच्या तोंडावर सणासुदीला शेतकऱ्यांच्या संभाव्य आर्थिक अडचणी समोर आणल्या. ही बाब जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने गांभीर्याने घेत सणासुदीच्या काळात शेतीमाल विक्रीसाठी प्रतीक्षा करून आर्थिक कुचंबणा होणार असल्याने तातडीने हे आदेश बाजार समित्यांना दिले आहेत. 

शुक्रवार (ता. २९) पासून ते ८ नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच १० दिवस बाजार समित्यांनी लिलावाचे कामकाज बंद केल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी होणार होती. या गैरसोयीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. आता दिलेल्या आदेशात कुठल्याही परिस्थितीत सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी शेतीमाल खरेदी विक्रीचे सौदे बंद ठेवता येणार नसल्याबाबत स्पष्टपणे कळविले आहे. यापूर्वी सुट्ट्या मंजूर करून दिलेल्या असल्याचे कार्यालयाने नमूद केले आहे.

 आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करा  पणन संचालनालयाच्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असून, कार्यालयाने बाजार समितीस मंजूर करून दिलेल्या सुट्ट्यांच्या व्यतिरिक्त इतर दिवशी बाजार समित्यांमध्ये शेतीमाल खरेदी विक्री बंद राहणार नाही, याची दक्षता घ्या असे सूचित केले आहे. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येऊन तसा अहवाल सादर करावा. बाजार समितीकडून अंमलबजावणी न झाल्यास बाजार समिती संचालक व सचिव यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल, असा सूचक इशारा जिल्हा उपनिबंधकांनी दिला आहे.

‘ॲग्रोवन’ने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून आवाज उठविल्यामुळे हा आदेश निघाला. १० दिवस बाजार समित्या बंद म्हणजे हा निर्णय बाजार समिती संचालक व व्यापाऱ्यांचा संगनमताने घेतला का, असा प्रश्‍न निर्माण होतो. यापूर्वी ‘ॲग्रोवन’ने बाजार समित्या बंद राहात असल्याने शेतकऱ्यांची बाजू मांडली आहे. आता वेळ आहे, शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या गप्पा मारत बाजार समितीत पद भूषविणाऱ्या संचालकांची.जोपर्यंत शेतकऱ्यांचे मतदान प्रत्यक्ष होणार नाही, तोपर्यंत संचालक व्यापाऱ्यांची बाजू घेत राहतील. आता व्यापारी काय करतात हे पाहणे अपेक्षित आहे.  - कैलास जाधव, शेतकरी, भरविर, ता. चांदवड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com