बुलडाण्यात बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदी विक्री सुरू 

बुलडाणा : जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू आहेत. यामध्ये सर्व शेतमालाची खरेदी करण्यात येत आहे. बाजार समितीचे कामकाज सुरू असताना ‘कोरोना’ विषाणू संसर्ग होणार नाही, यासाठी सर्व आवश्यक सूचना संबंधित बाजार समित्यांना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी दिली.
Market commodities start selling commodities
Market commodities start selling commodities

बुलडाणा : जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू आहेत. यामध्ये सर्व शेतमालाची खरेदी करण्यात येत आहे. बाजार समितीचे कामकाज सुरू असताना ‘कोरोना’ विषाणू संसर्ग होणार नाही, यासाठी सर्व आवश्यक सूचना संबंधित बाजार समित्यांना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी दिली. 

बाजार समितीमध्ये शेतमालाची खरेदी विक्री होत असताना गेटवर सॅनिटायझर व हात स्वच्छ धुण्यासाठी व्यवस्था करणे, सर्वांनी तोंडावर मास्क लावणे, गर्दी टाळून सोशल डिस्टसिंग पाळणे, परिसर व स्वच्छतागृह स्वच्छ करणे, परिसर निर्जंतुकीकरण करणे, शेतमालाचा लिलाव करताना शेतमालाचे ढेर विशिष्ट अंतरावर टाकणे, वेगवेगळ्या शेतमालाचा वेगवेगळ्या वेळेवर करणे, गर्दी टाळण्याकरिता शेतकऱ्यांची नोंदणी पद्धत अवलंबिणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. 

शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणण्यापूर्वी बाजार समितीचे सचिव किंवा संबंधित आडते, व्यापारी यांच्यासोबत संपर्क करून त्यांनी केलेल्या नियोजनानुसार वेळ व दिनांक प्राप्त करून घ्यावे. त्याच वेळेमध्ये शेतमाल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा. संचारबंदीत शेतमाल विक्रीस आणण्यासाठी पोलिसांनी मुभा दिलेली आहे. वरील सर्व उपाययोजना अमलात आणून ‘कोरोना’ आजाराला दूर ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे. शेतमाल विक्रीबाबत अधिक माहितीसाठी बाजार समित्यांचे सचिव यांना संपर्क करावा. 

बाजार समिती सचिवांचे संपर्क क्रमांक ः  बुलडाणा बाजार सचिव श्रीमती वनिता साबळे ९४२२८८४७४५, मोताळा सचिव एस. जी राहणे ९४२१४७३२९७, मलकापूर सचिव बी. जे. जगताप ९४२२९४०६८१, नांदुरा सचिव गौरव गवळे ९५४५७७४२९७, जळगाव जामोद सचिव प्र. ना. पुदागे ९४२१४६५०७७, संग्रामपूर सचिव पी. एन. मारोळे ९६३७११०७४७, शेगांव सचिव वि. गु. पुंडकर ८१४९७७४४४१, खामगाव सचिव एम. एस. भिसे ७७२००३९५६१, चिखली सचिव आर. जे. शेटे ९४२३७३९९४१, मेहकर सचिव श्री. बार्डेकर ९०११२२७९९८, देऊळगावराजा सचिव कि. वि. म्हस्के ८८३०८३८७७१, सिंदखेड राजा सचिव ओ. व्ही. महाजन ९९२३६०६५६३ आणि लोणार सचिव रा. ते. वायाळ ९८९०४६४८२५ 

आवकच नाही सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांमध्ये गोंधळ बनलेला आहे. प्रशासन बाजार समित्या सुरू असल्याचे सांगत असले तरी व्यवहार ठप्प आहेत. जिल्हा उपनिबंधकांनी आता आवाहन केल्याने बाजार समित्यांचे प्रशासन व्यापारी, आडते यांच्याशी चर्चा करून खरेदीबाबत तोडगा काढणार आहे. एकाच वेळी गर्दी होण्याची शक्यता पाहता यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे एका बाजार समितीच्या सचिवांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com