Agriculture news in Marathi Market commodities start selling commodities | Page 2 ||| Agrowon

बुलडाण्यात बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदी विक्री सुरू 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 एप्रिल 2020

बुलडाणा : जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू आहेत. यामध्ये सर्व शेतमालाची खरेदी करण्यात येत आहे. बाजार समितीचे कामकाज सुरू असताना ‘कोरोना’ विषाणू संसर्ग होणार नाही, यासाठी सर्व आवश्यक सूचना संबंधित बाजार समित्यांना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी दिली. 

बुलडाणा : जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू आहेत. यामध्ये सर्व शेतमालाची खरेदी करण्यात येत आहे. बाजार समितीचे कामकाज सुरू असताना ‘कोरोना’ विषाणू संसर्ग होणार नाही, यासाठी सर्व आवश्यक सूचना संबंधित बाजार समित्यांना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी दिली. 

बाजार समितीमध्ये शेतमालाची खरेदी विक्री होत असताना गेटवर सॅनिटायझर व हात स्वच्छ धुण्यासाठी व्यवस्था करणे, सर्वांनी तोंडावर मास्क लावणे, गर्दी टाळून सोशल डिस्टसिंग पाळणे, परिसर व स्वच्छतागृह स्वच्छ करणे, परिसर निर्जंतुकीकरण करणे, शेतमालाचा लिलाव करताना शेतमालाचे ढेर विशिष्ट अंतरावर टाकणे, वेगवेगळ्या शेतमालाचा वेगवेगळ्या वेळेवर करणे, गर्दी टाळण्याकरिता शेतकऱ्यांची नोंदणी पद्धत अवलंबिणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. 

शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणण्यापूर्वी बाजार समितीचे सचिव किंवा संबंधित आडते, व्यापारी यांच्यासोबत संपर्क करून त्यांनी केलेल्या नियोजनानुसार वेळ व दिनांक प्राप्त करून घ्यावे. त्याच वेळेमध्ये शेतमाल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा. संचारबंदीत शेतमाल विक्रीस आणण्यासाठी पोलिसांनी मुभा दिलेली आहे. वरील सर्व उपाययोजना अमलात आणून ‘कोरोना’ आजाराला दूर ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे. शेतमाल विक्रीबाबत अधिक माहितीसाठी बाजार समित्यांचे सचिव यांना संपर्क करावा. 

बाजार समिती सचिवांचे संपर्क क्रमांक ः 
बुलडाणा बाजार सचिव श्रीमती वनिता साबळे ९४२२८८४७४५, मोताळा सचिव एस. जी राहणे ९४२१४७३२९७, मलकापूर सचिव बी. जे. जगताप ९४२२९४०६८१, नांदुरा सचिव गौरव गवळे ९५४५७७४२९७, जळगाव जामोद सचिव प्र. ना. पुदागे ९४२१४६५०७७, संग्रामपूर सचिव पी. एन. मारोळे ९६३७११०७४७, शेगांव सचिव वि. गु. पुंडकर ८१४९७७४४४१, खामगाव सचिव एम. एस. भिसे ७७२००३९५६१, चिखली सचिव आर. जे. शेटे ९४२३७३९९४१, मेहकर सचिव श्री. बार्डेकर ९०११२२७९९८, देऊळगावराजा सचिव कि. वि. म्हस्के ८८३०८३८७७१, सिंदखेड राजा सचिव ओ. व्ही. महाजन ९९२३६०६५६३ आणि लोणार सचिव रा. ते. वायाळ ९८९०४६४८२५ 

आवकच नाही
सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांमध्ये गोंधळ बनलेला आहे. प्रशासन बाजार समित्या सुरू असल्याचे सांगत असले तरी व्यवहार ठप्प आहेत. जिल्हा उपनिबंधकांनी आता आवाहन केल्याने बाजार समित्यांचे प्रशासन व्यापारी, आडते यांच्याशी चर्चा करून खरेदीबाबत तोडगा काढणार आहे. एकाच वेळी गर्दी होण्याची शक्यता पाहता यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे एका बाजार समितीच्या सचिवांनी सांगितले. 
 


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते २३००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये अकोला ः...
नगरमध्ये दोडका, वांगी, भेंडीच्या दरात...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नागपुरात सोयाबीन दरात तेजीनागपूर : सोयाबीन दरातील तेजी कायम असून कळमना...
चाकणच्या जनावरांच्या बाजारात ७० लाखांची...चाकण, जि. पुणे : येथील महात्मा फुले बाजार आवारात...
राज्यात जांभळांना ३००० ते १६००० रुपयेजळगावात क्विंटलला ६००० ते ९००० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याची आवक घटली; दरात...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहात...
औरंगाबादमध्ये आंब्यांना सरासरी २४५० ते...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये आंब्यांचे...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात लसूण ३५०० ते १२००० रुपयेपरभणीत क्विंटलला ५००० ते ६५०० रुपये परभणी...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक बाजार...
पुण्यात कांदा, बटाटा, घेवड्याच्या दरात...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात लिंबू ६०० ते ३००० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते २००० रुपये...
नागपुरात सोयाबीनला ७४०० रुपयांचा दरनागपूर : कळमना बाजार समितीत सोयाबीनमधील तेजी कायम...
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात १० ते २०...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात हिरवी मिरची १००० ते ३००० रुपयेजळगावात क्विंटलला १८०० ते २८०० रुपये...
सोलापुरात डाळिंबाच्या दरात तेजी टिकूनसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा, मागणी...पुणे ः पुणे बाजार समितीमध्ये सोमवारी (ता.१७)...
राज्यात कांदा १०० ते १५०० रुपयेसोलापुरात क्विंटलला १०० ते १००० रुपये सोलापूर...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात गाजर, काकडी, लिंबाला उठाव;...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...