Agriculture news in marathi, The market in Sangli 5500 rupee per quintal rate for jaggery | Agrowon

सांगलीच्या बाजारपेठेत गुळाला ५५०० रुपये प्रतिक्विंटल दर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

सांगली : महापुरामुळे तसेच बरेच रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील बरीच आवक ठप्प होती. पूर ओसरल्यानंतर आवक सुरू झाली असून गूळ व बेदाणा सौद्यांना बुधवारी (ता १४) प्रारंभ झाला. गुळाच्या सौद्यांमध्ये प्रतिक्विंटल ५५०० रूपये असा उच्चांकी दर मिळाला.

सांगली : महापुरामुळे तसेच बरेच रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील बरीच आवक ठप्प होती. पूर ओसरल्यानंतर आवक सुरू झाली असून गूळ व बेदाणा सौद्यांना बुधवारी (ता १४) प्रारंभ झाला. गुळाच्या सौद्यांमध्ये प्रतिक्विंटल ५५०० रूपये असा उच्चांकी दर मिळाला.

निम्मी सांगली महापुरात गेले आठवडाभर बुडाली. तसेच सांगलीच्या आसपासची गावेदेखील पुराने वेढली गेली. सांगलीत येणारे पूर्वेकडील आणि उत्तरेकडील मार्ग सोडले, तर इतर मार्ग बंदच होते. काही व्यापारी आणि हमालांची घरेदेखील पाण्याखाली गेली. आवक बंद असल्यामुळे मार्केट यार्डातील तुरळक प्रमाणात व्यवहार सुरू होते. सौदे बंदच होते.

महापुराचा मार्केट यार्डातील व्यापाराला देखील चांगलाच फटका बसला. कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. दोन-तीन दिवसांपासून पुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर मार्केट यार्डातही हळूहळू उलाढाल सुरू झाली आहे. त्यामुळे गूळ आणि बेदाणा सौदे सुरू करण्याचा निर्णय घेतला.

बुधवारी सकाळी गुळाचे सौदे सुरू झाले. मेसर्स मगदूम व लठ्ठे पेढीमध्ये झालेल्या गुळाच्या सौद्यात कर्नाटकातील प्रगतिशील शेतकरी, कारिगार अशोक मलकारी (रा. निडगुंदी ता. रायबाग) यांच्या गुळाला प्रतिक्विंटल ५५०० रुपये दर मिळाला. मे. महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीने हा गूळ खरेदी केला. 

दरम्यान, मार्केट यार्डातील सौदे पूर्ववत सुरू झाले असून, गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी गूळ विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणावा, असे आवाहन सभापती दिनकर पाटील व प्रभारी सचिव व्ही. जे. राजशिर्के यांनी केले आहे.

इतर बाजारभाव बातम्या
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
बऱ्हाणपुरात केळीला १८०० रुपयांपर्यंत दरजळगाव : खानदेशसह लगतच्या मध्य प्रदेशात केळीच्या...
सोलापुरात डाळिंबाच्या दराची उसळीसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत फ्लॉवर २५०० ते ३५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
सांगलीच्या बाजारपेठेत गुळाला ५५०० रुपये...सांगली : महापुरामुळे तसेच बरेच रस्ते...
नाशिकमध्ये कांदा प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
जळगाव बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
पुण्यात भेंडी, गवार, वांगी, घेवड्याचे...पुणे ः आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून पडणाऱ्या...
औरंगाबादेत भेंडी १००० ते ४००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत गवार प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल ४५०० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल सरासरी ५६००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
जळगावात टोमॅटो, गवारीचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो व...
सोलापुरात वांगी, घेवडा, काकडीच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हरभरा वगळता शेतीमालाची आवक जेमतेमनागपूर ः हरभऱ्याच्या सरासरी एक हजार क्‍विंटलच्या...
पुण्यात कांदा, आले, बीटच्या दरात सुधारणापुणे ः खरिपातील भाजीपाल्याच्या उत्पादनाला सुरवात...
औरंगाबादेत हिरवी मिरची २००० ते २८००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत कारले प्रतिक्विंटल १५०० ते २०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...