agriculture news in Marathi, market trade in NCDEX and MCX | Agrowon

कापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढ
डॉ.अरूण कुलकर्णी
शुक्रवार, 21 जून 2019

रब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत. हरभऱ्याचा शासनाकडील साठा कधीही बाजारात येईल, अशी अपेक्षा असल्याने त्याचे भाव नरम आहेत. या सप्ताहात कापूस, मका, गवार बी व सोयाबीन यांचे भाव वाढले. हळद, गहू व हरभरा यांचे भाव कमी झाले. 

रब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत. हरभऱ्याचा शासनाकडील साठा कधीही बाजारात येईल, अशी अपेक्षा असल्याने त्याचे भाव नरम आहेत. या सप्ताहात कापूस, मका, गवार बी व सोयाबीन यांचे भाव वाढले. हळद, गहू व हरभरा यांचे भाव कमी झाले. 

या वर्षी मॉन्सून उशिरा येत आहे.  १८ जूनपर्यंत झालेला मॉन्सून हा सरासरीपेक्षा ४४ टक्क्यांनी कमी आहे. यापुढील किमती बहुतांश मॉन्सूनच्या प्रगतीवर अवलंबून आहेत. पेरण्या उशिरा होत असल्यामुळे उत्पादनाचे अंदाज करणे कठीण झाले आहे. त्यामुळे खरीप पिकांचे भाव वाढले आहेत. रब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत. हरभऱ्याचा शासनाकडील साठा कधीही बाजारात येईल अशी अपेक्षा असल्याने त्याचे भाव नरम आहेत. या सप्ताहात कापूस, मका, गवार बी व सोयाबीन यांचे भाव वाढले. हळद, गहू व हरभरा यांचे भाव कमी झाले.  पुढील काही महिन्यांत सोयाबीन व कापूस वगळता इतर सर्व पिकांचे भाव वाढतील, पुढील वर्षासाठी खरीप पिकांचे हमीभाव जूनअखेर जाहीर होण्याची शक्यता आहे. 

गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स आणि एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार 
मका (रब्बी) 
रब्बी मक्याच्या (जुलै २०१९) किमती मे महिन्यात २३ तारखेपर्यंत वाढत रु. १,९९४ पर्यंत गेल्या. नंतर त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या ७.८ टक्क्यांनी वाढून रु. १,९५२ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,८४३ वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. सप्टेंबर डिलिव्हरीचे भाव रु. २,०१६ आहेत. 

हरभरा 
हरभऱ्याच्या फ्युचर्स (जुलै २०१९) किमती  २० मे पर्यंत वाढत रु. ४,७९३ पर्यंत गेल्या. नंतर त्या घसरल्या. गेल्या सप्ताहात त्या ३.२ टक्क्यांनी घसरून रु. ४,४२१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ४.१ टक्क्यांनी घसरून रु. ४,२४१ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,२०० वर आल्या आहेत.  सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा सप्टेंबर २०१९ मधील फ्युचर्स किमती ३.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३३५). शासनाकडे पुरेसा साठा आहे. आवक वाढू लागली आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). 

सोयाबीन 
सोयाबीन फ्युचर्स (जुलै २०१९) किमती  १५ मेपर्यंत वाढत रु. ३,८२५ पर्यंत गेल्या. नंतर त्या घसरत आहेत. या सप्ताहात त्या रु. ३,६४२ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती ०.६ टक्क्यांनी वाढून रु. ३,७८५ वर आल्या आहेत. १८ जून रोजी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी डिलिव्हरी साठी अनुक्रमे रु. ३,६६०, ३,६८४, ३,४७१, ३,५२५, ३,५३५ व ३,५२५ भाव होते.  

साखर 
साखरेच्या (जुलै २०१९) किमती मेमध्ये व्यवहार नसल्याने रु. ३,११९ वर स्थिर होत्या. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१५० वर आलेल्या आहेत.  भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे.  

गहू  
गव्हाच्या (जुलै २०१९) किमती मे महिन्यात वाढत रु. २,०५१ पर्यंत गेल्या होत्या.  गेल्या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी घसरून रु. १,९७८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ०.७ टक्क्यांनी घसरून रु. १,९६५ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. १,९५७ वर  आल्या आहेत. सप्टेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,०४४).  नवीन हमीभाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). 

गवार बी 
गवार बीच्या फ्युचर्स (जुलै २०१९) किमती  मे  महिन्यात घसरत  होत्या (रु. ४,५६८ ते रु. ४,३३०). गेल्या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी घसरून रु. ४,२१० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी वाढून रु. ४,२७३ वर आल्या आहेत.  स्पॉट (जोधपूर) किमती  रु. ४,२९९ वर स्थिर आहेत.  सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा सप्टेंबर २०१९ मधील फ्युचर्स किमती २.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३९०).

 कापूस 
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जुलै २०१९) किमती १३ मेपर्यंत घसरत होत्या. नंतर त्या वाढत आहेत. गेल्या सप्ताहात त्या ३.६ टक्क्यांनी घसरून  रु. २१,३२० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३ टक्क्यांनी वाढून रु. २१,९६० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २१,८६० वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २०,८२० वर आल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.८ टक्क्यांनी कमी आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाचे उत्पादन कमी आहे. पण आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणामसुद्धा किमतींवर होत आहे. 
(टीप ः सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोच्या गाठी).    

    
इमेल ः  arun.cqr@gmail.com

इतर अॅग्रोमनी
हळद, गहू, हरभऱ्याच्या फ्युचर्स किमतींत...हळदीच्या डिसेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती...
शेतमालाच्या किमतीत स्थिरतेचा कलचीनकडून शेतमालाची आयात अजून वाढलेली नाही....
कृषी अर्थव्यवस्थेसाठीही मार्गदर्शक...ज्यांचे मोठेपण त्यांच्या हयातीतच समाजाला प्रतीत...
देशात मक्याची ७५ लाख हेक्टरवर लागवड नवी दिल्ली ः मागील आठवड्यात दक्षिण आणि मध्य...
सोयाबीन, हळद, गव्हाच्या फ्युचर्स...सोयाबीन फ्युचर्स किमती या सप्ताहात ५ टक्क्यांनी...
देशात कापूस लागवड क्षेत्रात वाढमुंबई ः चांगल्या पाऊसमानामुळे देशातील कापूस...
घरात काटकसर, पीक उत्पादनामध्ये...सांगली जिल्ह्यातील खटाव (ता. पलूस) येथील तात्यासो...
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलहळदीच्या नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती...
एचटी कापूस वाण परवानगीची बियाणे...नागपूर ः शेतकऱ्यांकडून अवैधरीत्या तणाला सहनशील (...
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
कागलचा शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्टनवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या...
पोल्ट्रीला धान्य पुरवठ्यासाठी...पुणे : विविध कारणांमुळे तोट्यात चाललेल्या लेअर...
स्फुरद, पालाशयुक्त खतांसाठी अनुदान दर...नवी दिल्ली : स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक...
ऊस बियाणे विक्रीसह भाडे तत्त्वावरील...उसाच्या बियाणे प्लॉटच्या माध्यमातून एकरी तीस ते...
उत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा ‘पेप्सिको’चा...नवी दिल्ली : अन्न आणि शीतपेय उत्पादनात मोठी...
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीचा वाढीचा कलपुढील महिन्यात रब्बी मका, गहू आणि हरभरा यांचे भाव...
ओढकामाच्या बैलांवर येतेय गदा ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
बांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...