नांदेड : मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडे बाजार बंद

नांदेड : मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडे बाजार बंद
नांदेड : मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडे बाजार बंद

नांदेड ः लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी गुरुवारी (ता. १८) जिल्ह्यात भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्गमीत केले आहेत.   

जिल्ह्यातील नांदेड, हिंगोली आणि लातूर या लोकसभा मतदारसंघांतील किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर मुखेड या नऊ विधानसभा मतदारसंघांत गुरुवारी (ता. १८) मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्यास परवानगी दिली आहे. 

मालेगाव (ता. अर्धापूर), नायगाव (बा.), भोकर, वाळकी खु, ल्याहारी (वाळकी फाटा), तळणी (ता. हदगाव), उमरी बा., बेल्लोरी (धा.) (ता. किनवट), लोणी (ता.देगलूर), बिलोली, बेटमोगरा, राजुरा बु (ता. मुखेड), सिडको (ता. नांदेड), कुरुळा, मंगलसांगवी (ता. कंधार) या ठिकाणी गुरुवारी भरणारे आठवडे बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता. १९) भरविण्यात यावेत, असे आदेश जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com