कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
ताज्या घडामोडी
पणनची कापूस खरेदी रविवारपासून बंद
हमीभाव केंद्रांवरील मंदावलेली आवक या कारणांमुळे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने रविवार (ता. २८)पासून कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर : बाजारात हमीभावापेक्षा कापसाला मिळणारा अधिकचा दर, त्यामुळे हमीभाव केंद्रांवरील मंदावलेली आवक या कारणांमुळे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने रविवार (ता. २८)पासून कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्क्युलेटिंग मीटिंगच्या माध्यमातून हा ठराव घेण्यात आला.
गेल्या वर्षीच्या हंगामात बाजारात हमीभावापेक्षा कमी दर होते. परिणामी, राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाला विक्रमी कापूस खरेदी करावी लागली. या वर्षी मात्र विरोधाभासी चित्र पाहावयास मिळत आहे. केंद्र शासनाने कापसाला पाच हजार आठशे पंचवीस रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र खुल्या बाजारात हमीभावापेक्षा चारशे ते पाचशे रुपये अधिकचा दर दिला जात असून, खुल्या बाजारातील कापसाचे दर ६३०० ते ६४०० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे राज्यात पणन महासंघाच्या केंद्रांवर एक क्विंटल ही आवक होत नव्हती.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता आहे. त्यामुळे खरेदी बंद करण्याचा ठराव घेऊन तो संचालकांना ऑनलाइन पाठविला जाणार आहे. त्यावर त्यांनी होकार-नकार कळवायचा आहे. कापूस उत्पादकते बाबत यावर्षी शासन आणि कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया वेगवेगळे दावा करीत आहे. ३७१ लाख गाठींची उत्पादकता देशात होणार असल्याचा दावा सरकारने केला आहे. याउलट कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने तीनशे साठ लाख गाठींची उत्पादकता होण्याचा अंदाज वर्तविला आहे. महाराष्ट्रात ८५ ते ८६ लाख गाठींचे उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविला गेला आहे. मात्र कीड-रोग व पावसामुळे ही उत्पादकता कमी होऊन ७० ते ७५ लाख गाठींपर्यंत खाली येईल, असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.
हमीभावापेक्षा बाजारात अधिक दर आहेत. त्यामुळे आवक होत नसल्याने रविवारपासून खरेदी बंद करण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे.
- अनंतराव देशमुख, अध्यक्ष, राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघया वर्षीच्या हंगामात सुरुवातीला संततधार पाऊस, त्यानंतर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढीस लागला. त्यामुळे कापसाची उत्पादकता प्रभावित झाली आहे. काही शेतकऱ्यांनी फरदड न घेताच कापूस काढून टाकला. त्याचाही परिणाम उत्पादकतेवर झाला आहे. परिणामी, खुल्या बाजारात दर वाढले आहेत. सद्यःस्थितीत शेतकऱ्यांकडे दहा टक्के कापूस शिल्लक आहे. लॉकडाउनच्या भीतीने हा कापूस शेतकरी बाजारात आणतील. - गोविंद वैराळे, ज्येष्ठ कापूस अभ्यासक
- 1 of 1098
- ››