Agriculture news in Marathi Marketing cotton purchases closed from Sunday | Agrowon

पणनची कापूस खरेदी रविवारपासून बंद

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

हमीभाव केंद्रांवरील मंदावलेली आवक या कारणांमुळे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने रविवार (ता. २८)पासून कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर : बाजारात हमीभावापेक्षा कापसाला मिळणारा अधिकचा दर, त्यामुळे हमीभाव केंद्रांवरील मंदावलेली आवक या कारणांमुळे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने रविवार (ता. २८)पासून कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्क्युलेटिंग मीटिंगच्या माध्यमातून हा ठराव घेण्यात आला.

गेल्या वर्षीच्या हंगामात बाजारात हमीभावापेक्षा कमी दर होते. परिणामी, राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाला विक्रमी कापूस खरेदी करावी लागली. या वर्षी मात्र विरोधाभासी चित्र पाहावयास मिळत आहे. केंद्र शासनाने कापसाला पाच हजार आठशे पंचवीस रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र खुल्या बाजारात हमीभावापेक्षा चारशे ते पाचशे रुपये अधिकचा दर दिला जात असून, खुल्या बाजारातील कापसाचे दर ६३०० ते ६४०० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे राज्यात पणन महासंघाच्या केंद्रांवर एक क्विंटल ही आवक होत नव्हती.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता आहे. त्यामुळे खरेदी बंद करण्याचा ठराव घेऊन तो संचालकांना ऑनलाइन पाठविला जाणार आहे. त्यावर त्यांनी होकार-नकार कळवायचा आहे. कापूस उत्पादकते बाबत यावर्षी शासन आणि कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया वेगवेगळे दावा करीत आहे. ३७१ लाख गाठींची उत्पादकता देशात होणार असल्याचा दावा सरकारने केला आहे. याउलट कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने तीनशे साठ लाख गाठींची उत्पादकता होण्याचा अंदाज वर्तविला आहे. महाराष्ट्रात ८५ ते ८६ लाख गाठींचे उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविला गेला आहे. मात्र कीड-रोग व पावसामुळे ही उत्पादकता कमी होऊन ७० ते ७५ लाख गाठींपर्यंत खाली येईल, असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.

हमीभावापेक्षा बाजारात अधिक दर आहेत. त्यामुळे आवक होत नसल्याने रविवारपासून खरेदी बंद करण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे.
- अनंतराव देशमुख, अध्यक्ष, राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ

या वर्षीच्या हंगामात सुरुवातीला संततधार पाऊस, त्यानंतर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढीस लागला. त्यामुळे कापसाची उत्पादकता प्रभावित झाली आहे. काही शेतकऱ्यांनी फरदड न घेताच कापूस काढून टाकला. त्याचाही परिणाम उत्पादकतेवर झाला आहे. परिणामी, खुल्या बाजारात दर वाढले आहेत. सद्यःस्थितीत शेतकऱ्यांकडे दहा टक्के कापूस शिल्लक आहे. लॉकडाउनच्या भीतीने हा कापूस शेतकरी बाजारात आणतील. - गोविंद वैराळे, ज्येष्ठ कापूस अभ्यासक


इतर ताज्या घडामोडी
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...
दुर्लक्षित पिकांनाही येत्या काळात संधीद्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, संत्रा ही राज्याच्या...
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात...गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा...