पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारे

राज्यात मागणप्रमाणे केंद्र सुरू करण्यात येत आहेत. गुरुवार (ता. ५) पर्यंत केंद्र संख्या ३४ वर पोचली आहे. आतापर्यंत ९ कोटींचे चुकारे करण्यात आले. चुकारे तत्काळ व्हावे याकरिता देखील पणनचा महासंघाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी बॅंक आणि पतसंस्था यांच्यात गफलत करू नये. बॅंक खात्याची माहिती दिल्यास चुकारे करणे सोयीचे होते - अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ
पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारे
पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारे

अमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडे कापसाचा फ्लो वाढता आहे. आठवडाभरात ३४ केंद्र सुरू करणाऱ्या पणन महासंघाची खरेदी १ लाख क्‍विंटलवर पोचली असून, त्यापोटी तब्बल ९ कोटी रुपयांचे चुकारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात आले आहे.  मॉन्सूनोत्तर पावसामुळे कापूस भिजल्याने व्यापाऱ्यांकडून त्याआड ओलाव्याच्या प्रमाणात कापसाला दर दिला जात आहे. खासगी बाजारात ५१०० रुपये सरासरी दर देत कापूस खरेदी केली जात आहे. दुसरीकडे पणन महासंघाकडून ५५५० रुपयांचा हमीभाव दिला जात आहे. त्याकरीता ८ टक्‍क्‍यांपर्यंत ओलाव्याची अट आहे. आठ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक ओलावा असल्यास प्रति एक टक्‍क्‍याप्रमाणे एका किलो कापसाचे पैसे कापले जातात. बारा टक्‍क्यांपर्यंतच ओलावा असल्यास शासकीय केंद्रावर कापसाची खरेदी होते. आठ ते १२ किलो यातील तफावत म्हणून चार किलोचे पैसे कापले जातात. त्यानंतरही सरासरी ५३३५ रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कापूस पणन महासंघाकडे कापूस विक्रीकडे कल वाढला आहे. मराठवाड्यातील शेतकरी यात सर्वांत पुढे आहेत.  दरम्यान, कापूस पणन महासंघाला साडेतीन हजार कोटी रुपयांची बॅंक गॅरंटी मिळाली आहे. त्यामुळे तत्काळ चुकाऱ्याची कोणतीच अडचण नाही. परंतु प्रशासकीय बाबींच्या पूर्ततेत दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. त्यानुसार तिऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत. आजवर सुमारे ९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात चुकाऱ्यापोटी टाकण्यात आले. काही शेतकऱ्यांनी पतसंस्थांचा खाते क्रमांक दिल्याने त्यांचे पैसे परत आले आहेत. त्या चुकांची दुरुस्ती करून परत पैसे टाकले जाणार आहेत.  विभागनिहाय कापूस खरेदी (क्‍विंटलमध्ये) नागपूर ः २०१८ वणी ः १०६ यवतमाळ ः २३ हजार ९१२ अकोला ः ३८९ अमरावती ः २०१४८ खामगाव ः ७ हजार ३०१ औरंगाबाद ः २२ हजार ३४४ परभणी ः ८ हजार ६१९ परळी ः ३३ हजार ३४२ नांदेड ः १४६५ जळगाव ः ५४६ एकूण ः १ लाख २ हजार ८९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com