agriculture news in Marathi marketing federation clear 9 crore rupees arrears Maharashtra | Agrowon

पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारे

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 डिसेंबर 2019

राज्यात मागणप्रमाणे केंद्र सुरू करण्यात येत आहेत. गुरुवार (ता. ५) पर्यंत केंद्र संख्या ३४ वर पोचली आहे. आतापर्यंत ९ कोटींचे चुकारे करण्यात आले. चुकारे तत्काळ व्हावे याकरिता देखील पणनचा महासंघाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी बॅंक आणि पतसंस्था यांच्यात गफलत करू नये. बॅंक खात्याची माहिती दिल्यास चुकारे करणे सोयीचे होते
- अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ

अमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडे कापसाचा फ्लो वाढता आहे. आठवडाभरात ३४ केंद्र सुरू करणाऱ्या पणन महासंघाची खरेदी १ लाख क्‍विंटलवर पोचली असून, त्यापोटी तब्बल ९ कोटी रुपयांचे चुकारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात आले आहे. 

मॉन्सूनोत्तर पावसामुळे कापूस भिजल्याने व्यापाऱ्यांकडून त्याआड ओलाव्याच्या प्रमाणात कापसाला दर दिला जात आहे. खासगी बाजारात ५१०० रुपये सरासरी दर देत कापूस खरेदी केली जात आहे. दुसरीकडे पणन महासंघाकडून ५५५० रुपयांचा हमीभाव दिला जात आहे. त्याकरीता ८ टक्‍क्‍यांपर्यंत ओलाव्याची अट आहे. आठ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक ओलावा असल्यास प्रति एक टक्‍क्‍याप्रमाणे एका किलो कापसाचे पैसे कापले जातात.

बारा टक्‍क्यांपर्यंतच ओलावा असल्यास शासकीय केंद्रावर कापसाची खरेदी होते. आठ ते १२ किलो यातील तफावत म्हणून चार किलोचे पैसे कापले जातात. त्यानंतरही सरासरी ५३३५ रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कापूस पणन महासंघाकडे कापूस विक्रीकडे कल वाढला आहे. मराठवाड्यातील शेतकरी यात सर्वांत पुढे आहेत. 

दरम्यान, कापूस पणन महासंघाला साडेतीन हजार कोटी रुपयांची बॅंक गॅरंटी मिळाली आहे. त्यामुळे तत्काळ चुकाऱ्याची कोणतीच अडचण नाही. परंतु प्रशासकीय बाबींच्या पूर्ततेत दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. त्यानुसार तिऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत. आजवर सुमारे ९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात चुकाऱ्यापोटी टाकण्यात आले. काही शेतकऱ्यांनी पतसंस्थांचा खाते क्रमांक दिल्याने त्यांचे पैसे परत आले आहेत. त्या चुकांची दुरुस्ती करून परत पैसे टाकले जाणार आहेत. 

विभागनिहाय कापूस खरेदी (क्‍विंटलमध्ये)
नागपूर ः २०१८
वणी ः १०६
यवतमाळ ः २३ हजार ९१२
अकोला ः ३८९
अमरावती ः २०१४८
खामगाव ः ७ हजार ३०१
औरंगाबाद ः २२ हजार ३४४
परभणी ः ८ हजार ६१९
परळी ः ३३ हजार ३४२
नांदेड ः १४६५
जळगाव ः ५४६
एकूण ः १ लाख २ हजार ८९


इतर बातम्या
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाला महत्त्व...नगर : ‘‘भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...