agriculture news in Marathi marketing federation initiative for textile park Maharashtra | Agrowon

टेक्‍सटाईल पार्कसाठी ‘पणन’चा पुढाकार

विनोद इंगोले
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

 केंद्रीय अर्थसंकल्पात सात नव्या टेक्‍सटाईल पार्कची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केली होती. 

नागपूर ः केंद्रीय अर्थसंकल्पात सात नव्या टेक्‍सटाईल पार्कची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केली होती. यातील एक पार्क विदर्भाला मिळावा आणि त्या माध्यमातून या भागात कापसावरील प्रक्रियेला चालना मिळत त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी व्हावी याकरिता महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी लवकरच संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चेचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. 

देशातील दहा राज्यांत कापूस लागवड होते. परंतु गेल्या काही वर्षांत बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने कापसाची उत्पादकता सातत्याने कमी होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कापसाचे प्रक्रिया उद्योग उभारणी झाल्यास कमी उत्पादकतेच्या काळात अधिक दराच्या माध्यमातून काही प्रमाणात तूट भरुन काढणे शक्‍य होणार आहे. केंद्र सरकारने नुकतीच देशात सात नव्या टेक्‍सटाईल पार्क उभारणीची घोषणा केली. त्यातील एक पार्क खानदेशमध्ये उभारण्यात यावा, अशा आशयाचे मागणीवजा विनंती पत्र खासदार उन्मेष पाटील यांनी केंद्र सरकारला पाठविले आहे. 

विदर्भातून मात्र अशाप्रकारची मागणी झाली नसली तरी आता थेट पणन महासंघाकडूनच टेक्‍सटाईल पार्कच्या उभारणीसंदर्भाने हालचाली होत असल्याने कापूस उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

प्रतिक्रिया
केंद्र सरकारने सात टेक्‍सटाईल पार्कची घोषणा केल्यानंतर त्यातील एक विदर्भात उभारले जाईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. राज्यात 42 लाख हेक्‍टरवर कापूस होतो. त्यातील 16 लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र विदर्भात आहे. त्यामुळे टेक्‍सटाईल पार्कची उभारणी झाल्यास कापूस उत्पादकांचे व्यापक हित त्यातून साधले जाणार आहे. त्याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत. पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांसमोर हा विषय मांडत त्यानंतर संचालक मंडळांच्या बैठकीत यावर चर्चा करुन पुढील रणनीती ठरविली जाईल.
- अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ 

‘सीसीआय’करीता एजंट म्हणून पणन महासंघाकडून कापूस खरेदी होते. त्यामुळे या यंत्रणेचा कापसातील अनुभव पाहता त्यांनीच टेक्‍सटाईल पार्ककरीता पुढाकार घेतल्यास निश्चितच व्यापक शेतकरी हित साधले जाईल. 
- गोविंद वैराळे, ज्येष्ठ कापूस अभ्यासक


इतर अॅग्रो विशेष
प्रतिकारशक्ती वाढीसाठी बेदाण्याचा वापर...सांगली ः होळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर मागणीत वाढ...
मर्यादित संशोधनामुळे रंगीत कापसाचा...नागपूर ः रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन...
इंडो-डच फूल संशोधन प्रकल्पाला गती पुणे ः इंडो-डच प्रकल्पांतर्गत राज्य कृषी पणन...
गूळ पावडरची अमेरिकेला निर्यात पुणे ः राज्य शासनच्या वतीने कृषी उद्योजकतेसाठी...
कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत नाशिक : जिल्ह्यात बाजारात खरीप हंगामातील नवीन लाल...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
थंडीत चढ-उतार पुणे ः अरबी समुद्राच्या वायव्य भागात चक्रीय...
शेतीमध्ये बदलली पीक पद्धतीमादणी (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील संदीप...
बायोस्टिम्युलंट्‍स’- कायद्याच्या कक्षेत...बिगर नोंदणीकृत किंवा ढोबळमानाने ‘पीजीआर’ अशी ओळख...
दूध विक्री कमिशनवर नियंत्रण आणा पुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना...
किमान तापमानात वाढ पुणे ः मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्रीय...
देशी कोंबडी पिलांच्या मागणीत ७० टक्के...नगर ः बर्ड फ्लूची लाट ओसरली आहे. मात्र तरीही...
‘पीएम-किसान’चे काम करण्यास महसूलचा नकार अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना...
‘पोकरा’मध्ये कामाची प्रक्रिया आता ऑनलाइनमुंबई/औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
राज्यात गहू क्षेत्रात ३८ टक्क्यांनी वाढनगर ः परतीच्या पावसाने पाण्याची बऱ्यापैकी...
तीन लाख शेतकऱ्यांनी भरली ३१२ कोटी...मुंबई : नवीन कृषिपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून...
इथेनॉल उत्पादनाचे वेळापत्रक कोलमडले पुणे : तेल कंपन्यांची साठवणक्षमता अपुरी पडत...
सुयोग्य व्यवस्थापनाचा आले शेतीतील आदर्शमौजे शेलगाव (खुर्द) (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद)...
पॅलेट स्वरूपातील कोंबडी खतनिर्मितीनाशिक जिल्ह्यातील बल्हेगाव (ता. येवला) येथील...
विक्रमी उत्पादनाचे करा योग्य नियोजनवर्ष २०२०-२१ च्या हंगामात देशात अन्नधान्याचे...