पणन महासंघाची कापूस खरेदी ‘सीसीआय’साठीच

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाच्या वतीने यावर्षीदेखील भारतीय कापूस महामंडळ(सीसीआय)ची नोडल एजन्सी म्हणूनच कापसाची खरेदी केली जाणार आहे. महासंघाने स्वतंत्रपणे कापूस खरेदीचा प्रस्ताव शासनाला दिला होता. मात्र त्याला मान्यता मिळाली नाही. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील महासंघाकडून ‘सीसीआय’साठीच खरेदी होणार आहे.

कापसाचा एकाधिकार सहा वर्षांपूर्वी संपुष्टात आल्यानंतर शेतकऱ्यांना कापूस कोठेही विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतरही बाजार कोसळू नये याकरीता पणन महासंघकडून बाजारात कापसाची खरेदी केली जाते. २०१५-१६ या वर्षात कापूस पणन महासंघाने अडीच लाख क्‍विंटल कापसाची खरेदी केली होती.

२०१६-१७ या वर्षातही ‘सीसीआय’करीता दोन टक्‍के कमिशनवर पणन महासंघाकडून कापूस खरेदी करण्यात आली. परंतु खुल्या बाजारात ४१६० रुपये या हमीभावापेक्षा ५५०० ते ६००० रुपये प्रती क्‍विंटल असा अधिक दर शेतकऱ्यांना मिळाला.

परिणामी पणन महासंघाची अपेक्षित खरेदी झाली नाही. याउलट खासगी व्यापाऱ्यांनी १२२ लाख २७ हजार ९८० क्‍विंटलपेक्षा अधिकची खरेदी केली. गेल्या वर्षी सीसीआयची ५८ तर पणन महासंघाची ५१ खरेदी केंद्र होती.

यावर्षीदेखील नोडल एजन्सी कापूस पणन महासंघाने स्वतंत्र कापूस खरेदी करण्याचा प्रस्ताव शासनाला दिला होता. परंतु त्याला मान्यता मिळाली नाही. परिणामी यावर्षीदेखील ‘सीसीआय’करीता कमिशन तत्त्वावरच पणन महासंघाची खरेदी होईल. त्या संदर्भाने ‘सीसीआय’सोबत पणन महासंघाच्या प्रशासनिक बैठका पार पडल्या आहेत.

शासनाला पणन महासंघाने स्वतंत्र कापूस खरेदीचा प्रस्ताव दिला होता. त्याला मान्यता मिळाली नाही. त्यामुळे यावर्षीदेखील सीसीआयकरिताच कमिशन तत्त्वावर खरेदी होणार आहे. त्या संदर्भाने लवकरच घोषणा होईल. - उषाताई शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कापूस पणन महामंडळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com