agriculture news in Marathi marketing federation taking initiative for Onion sell Maharashtra | Page 3 ||| Agrowon

कांदा विक्रीसाठी ‘पणन’चे प्रयत्न

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतमालाची पुरवठा साखळी खंडीत झाल्याने शेतकरी आणि ग्राहक हवालदिल झाले आहेत.

पुणे: कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतमालाची पुरवठा साखळी खंडीत झाल्याने शेतकरी आणि ग्राहक हवालदिल झाले आहेत. हि साखळी पुन्हा पूर्ववत होण्यासाठी राज्य कृषी पणन मंडळाने पुढाकार घेतला आहे. महाराष्‍ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार असून, राज्यातील सुमारे ११२ शेतकरी उत्पादक कंपनी आणि गटांची यादी देशातील विविध पणन मंडळांना पाठवली आहे. याद्वारे देशातील विविध खरेदीदार थेट कंपन्या आणि गटांशी बोलून कांदा खरेदी करणार आहे. 

याबाबतची माहिती कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. पवार म्हणाले,‘‘कोरोना लॉकडाऊनमुळे शेतमालाची पुरवठा साखळी खंडीत झाली आहे. राज्यातून देशात कांदा मोठ्याप्रमाणावर पाठविला जातो. सध्या वाहतूक बंद असल्याने शेतमालासह कांद्याचा उठाव कमी झाला आहे. प्रसंगी दर देखील कमी झाले आहेत. हि खंडीत झालेली पुरवठा साखळी सुरळीत होऊन, कांद्याचा उठाव व्हावा आणि शेतकऱ्याला दिलासा मिळावा यासाठी राज्यातील कांद्या मध्ये काम करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गटांची यादी देशातील सर्व कृषी पणन मंडळांना पाठवली आहे.

या मंडळांद्वारे खरेदीदार राज्यातील  कंपन्यांशी संपर्क साधून कांदा खरेदी करु शकणार आहे. खरेदी झालेला कांदा इतर राज्यांमध्ये पाठविण्यासाठी देखील सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून, यासाठी आंतरराज्य शेतमाल वाहतूक नियंत्रण कक्ष आणि टोल फ्री क्रमांक देखील कार्यान्वित करण्यात आला आहे.’’


इतर अॅग्रो विशेष
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...
मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...
'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...
टोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
टोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...
उष्णतेच्या लाटेने पिके होरपळलीपुणे : राज्यात मराठवाडा, विदर्भासह खानदेशात...
संसर्गाचे थैमान, महाराष्ट्र, तामिळनाडू...नवी दिल्ली : जगातील अन्य देशांसोबतच भारतातही...
सहकारी क्षेत्रातील दुग्ध उद्योगांसमोर...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
दूध रूपांतर योजनेचे १०० कोटी थकले पुणे: राज्यातील अतिरिक्त दुधाचे खरेदी करून भुकटी...
मॉन्सूनसाठी तयार होतेय पोषकस्थिती...पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात उन्हाच्या झळा असह्य पुणे: सुर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका...
नियमित कर्जदारांना द्या ५० हजाराचे...गोंदिया ः कोरोनामुळे प्रभावीत शेतीक्षेत्राला...
शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा...मुंबईः राज्यात  ५० हजार उद्योग सुरु झाले....
कापसाचा हमीभाव २६० रुपयांनी वाढवा :...नवी दिल्लीः कापसाच्या हमीभावात गेल्या वर्षीच्या...
भेसळयुक्‍त धान बियाणे पुरविणाऱ्या...भंडारा  ः गेल्या हंगामात भेसळयुक्‍त...