भंडाऱ्यात पणन अधिकाऱ्यांच्या समक्षच होणार धान खरेदी 

भंडाराजिल्ह्यात धान लागवड क्षेत्र आणि सरासरी उत्पादकता यानुसार धान्य उत्पादन कमी झाले आहे. मात्र त्यानंतरही आधारभूत केंद्रांवर आवक वाढल्याने जिल्हा पणन अधिकारी यांनी धान खरेदी थांबविण्याचे आदेश दिले
भंडाऱ्यात पणन अधिकाऱ्यांच्या  समक्षच होणार धान खरेदी Of marketing officers in the store Purchase of paddy will be done immediately
भंडाऱ्यात पणन अधिकाऱ्यांच्या  समक्षच होणार धान खरेदी Of marketing officers in the store Purchase of paddy will be done immediately

भंडारा : जिल्ह्यात धान लागवड क्षेत्र आणि सरासरी उत्पादकता यानुसार धान्य उत्पादन कमी झाले आहे. मात्र त्यानंतरही आधारभूत केंद्रांवर आवक वाढल्याने जिल्हा पणन अधिकारी यांनी धान खरेदी थांबविण्याचे आदेश दिले आहेत. पणन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच यापुढे धान खरेदी केली जाणार आहे. 

गेल्या वर्षीच्या हंगामात संततधार पाऊस अतिवृष्टी तसेच पुरामुळे बहुतांश ठिकाणी धान पीक उद्ध्वस्त झाले गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी उत्पादन देखील कमी झाली असे असताना धान्य केंद्रावर मात्र आवक वाढली आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील सरासरी ९५ टक्के शेतकऱ्यांकडील धानाची विक्री झाला आहे. अवघा पाच टक्के धान शिल्लक आहे. काही तालुक्यातील शंभर टक्के घराची खरेदी पूर्णत्वास गेली आहे. मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांकडील सात बाराचा दुरुपयोग करून व्यापाऱ्यांकडून धान विक्रीचे प्रकार घडत आहेत.

पणन अधिकाऱ्यांना दररोज प्राप्त होणाऱ्या अहवालात त्याचा खुलासा होतो. हमीभाव व बोनस मिळत असल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या सात बारावर धान विक्री होत आहे. काही धान खरेदी केंद्रावर प्रत्यक्षात धान साठा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व गैरप्रकाराची गंभीर दखल घेत अशा गैरप्रकार करणाऱ्या संस्थांची पोलिस तक्रार करीत त्याआधारे कारवाई करण्याची प्रक्रिया पणन मंडळाच्या विचाराधीन आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 

या नंतरच्या काळात ज्या संस्थांना खरेदी सुरू ठेवायची आहे त्यांनी पणन कार्यालयास पूर्व सूचना द्यावी त्यानंतर जिल्हा पणन अधिकारी कार्यालयातून प्रतिनिधी पाठवले जातील. त्यांच्या समक्षच धान खरेदीची प्रक्रिया करता येणार आहे. पणन विभागाचे अधिकारी शेतकरी आणि त्याच्याकडील धान या बाबत तपासणी करून धान खरेदी बाबत निर्णय घेतील. परस्पर धान खरेदी करणाऱ्या संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्याचा निर्णय पणन विभागाने घेतला आहे. पणन विभागाच्या या निर्णयामुळे संस्था चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

धान खरेदीवर दृष्टीक्षेप 

  • नुकसानीमुळे धान उत्पादन कमी, मात्र आवक वाढली 
  • गैरव्यवहार टाळण्यासाठी पणन कर्मचाऱ्यांच्या समक्षच धान खरेदी होणार 
  • जिल्ह्यातील सरासरी ९५ टक्के शेतकऱ्यांकडील धानाची विक्री, अवघे पाच टक्के धान शिल्लक 
  • काही तालुक्यांतील शंभर टक्के धान खरेदी पूर्ण 
  • शेतकऱ्यांकडील सात बाराचा दुरुपयोग करून व्यापाऱ्यांकडून धान विक्रीचे प्रकार 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com