agriculture news in marathi, marketing reforms bill may be introduced in the monsoon session, pune, maharashtra | Agrowon

पणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 जून 2019

पुणे  ः शेतीमाल पणन सुधारणांमधील महत्त्वाचे बदल असणारे विधेयक विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे. यामुळे पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर या महत्त्वाच्या बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजार समित्यांचा दर्जा मिळणार आहे. नवी दिल्ली येथे शनिवारी (ता. १५) निती आयोगाच्या बैठकीत पणन सुधारणांच्या अंमलजावणीचा आढावा घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी माध्यमांना देत पणन सुधारणांचे विधेयक मांडण्याचे संकेत दिल्याची चर्चा पणन क्षेत्रात आहे.

पुणे  ः शेतीमाल पणन सुधारणांमधील महत्त्वाचे बदल असणारे विधेयक विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे. यामुळे पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर या महत्त्वाच्या बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजार समित्यांचा दर्जा मिळणार आहे. नवी दिल्ली येथे शनिवारी (ता. १५) निती आयोगाच्या बैठकीत पणन सुधारणांच्या अंमलजावणीचा आढावा घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी माध्यमांना देत पणन सुधारणांचे विधेयक मांडण्याचे संकेत दिल्याची चर्चा पणन क्षेत्रात आहे.

बाजार समित्यांमधील शेतीमालाच्या पारंपरिक विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने ॲग्रिकल्चर प्रोड्यूस ॲण्ड लाइव्ह स्टॉक मार्केटिंग ॲक्टचा (मॉडेल ॲक्ट २०१७) मसूदा विविध राज्यांना सादर केला आहे. यामध्ये विविध १३९ सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने ज्या बाजार समित्यांमध्ये एकूण आवकेच्या ३० टक्के शेतीमाल दोन राज्यांतून येत असेल अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा आणि या बाजार समित्या निवडणूक प्रक्रियेतून बाहेर काढण्यात याव्यात, अशा प्रमुख सुधारणांचा समावेश आहे.

तसेच सर्व व्यवहार हे ऑनलाइन करण्याचे देखील सुचविण्यात आले आहे. या विविध सुधारणांचे विधेयक मागील अधिवेशनात सादर करण्यात आले होते. या विधेयकाला राज्यपालांच्या सहीने मान्यता देण्यात आली होती. विधेयकामधील अडतदारांना खरेदीदाराच्या भूमिकेत काम करण्यास मज्जाव करण्यात आला होता. या सुधारणेला अडतदारांनी विरोध करत, बाजार समित्या बंद ठेवत सरकारवर दबाव आणला होता. या दबावामुळे सरकारने विधेयक मागे घेत, विविध तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचे आश्‍वासन दिले होते.

यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे विधेयक रखडले. दरम्यान, विविध तरतुदींमध्ये नाममात्र सुधारणांकरत या विधेयकाचा अंतिम मसुदा तयार असून, हा मसुदा मुख्यमंत्री कार्यालयाचे माजी प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी अंतिम केल्याचे समजते. शनिवारी (ता. १५) निती आयोगाने विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत घेतली. या बैठकीत पणन सुधारणांचा आढावा घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना सांगितले.

यामुळे ज्या राज्यांनी अद्याप पणन सुधारणा केलेल्या नाहीत त्यांनी तातडीने करण्याचे आदेश दिल्याचे समजते. यामुळे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पणन सुधारणांचे विधेयक मंजूर होण्याची दाट शक्यता पणन मंत्रालय आणि संचालनालयाकडून वर्तविण्यात येत आहे. 
नफेखोरी टाळण्यासाठी अडत्यांना शेतीमाल खरेदी करता येणार नाही 

बाजार समित्यांमध्ये बहुतांश अडते हे शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने शेतीमाल खरेदी करून, नंतर जास्त दराने विक्री करत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना कमी दर मिळत असून, ग्राहकांना जास्त दराने तो खरेदी करावा लागत आहे. यामध्ये मोठी नफेखोरी अडतदार करीत आहे. हे टाळण्यासाठी अडतदारांनी केवळ शेतकरी आणि खरेदीदार यांच्यात समन्वय साधून शेतीमाल विक्री करावयाची आहे. या विक्रीमधील केवळ कमिशन घ्यावयाचे असून, खरेदीदाराने खरेदी केलेल्या शेतीमालाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करावयाची आहे, अशी तरतूद केली आहे. 

या आहेत प्रमुख सुधारणा 

  • बाजार समित्यांना मिळणार राष्ट्रीय दर्जा  
  • अडतदारांना शेतीमाल खरेदी करता येणार नाही.  अडतदारांनी केवळ कमिशन एजंटच्या भूमिकेतून काम करावे 
  • राष्‍ट्रीय बाजार समित्या निवडणुकीतून बाहेर काढणे  
  • अडतदारांना खरेदीदाराचा परवाना घ्यावा लागणार  
  • बाजार समित्यांमध्ये शेतीमाल खरेदीदारांना परवाना घ्यावा लागणार. यासाठी त्यांना बॅंक गॅरंटी द्यावी लागणार

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...