Agriculture news in Marathi The markets in Sindhudurg are bustling | Agrowon

सिंधुदुर्गातील बाजारपेठा गजबजल्या 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 मे 2020

सिंधुदुर्ग ः संचारबंदीमध्ये शिथिलता आणल्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा दीड महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर गजबजल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. वेंगुर्ला वगळता जिल्ह्यातील इतर बाजारपेठांमधील बहुतांशी दुकाने ८ ते १ या वेळेत उघडण्यास स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीकरिता झुंबड केली. 

सिंधुदुर्ग ः संचारबंदीमध्ये शिथिलता आणल्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा दीड महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर गजबजल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. वेंगुर्ला वगळता जिल्ह्यातील इतर बाजारपेठांमधील बहुतांशी दुकाने ८ ते १ या वेळेत उघडण्यास स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीकरिता झुंबड केली. 

लॉकडाऊन केल्यानंतर जिल्ह्यातील फक्त अत्यावश्‍यक सेवा पुरविणारी दुकाने सुरू होती. संचारबंदीची कडक अंमलबजावणी होत असल्यामुळे कुणीही ग्राहक बाजारपेठांमध्ये येण्यास धजावत नव्हता.वाहने ही बंद असल्यामुळे सर्वांची कुचंबणा झाली होती. परंतु सिंधुदुर्ग जिल्हा आँरेज झोनमध्ये समाविष्ट झाल्यानंतर जिल्ह्यातील संचारबंदीत शिथिलता आणली आहे. 

स्थानिक नगरपालिका, नगरपंचायतींनी आपआपल्या भागातील बाजारपेठांचे नियोजन करावे, असे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वेंगुर्ला वगळता इतर सर्वच शहरांतील बाजारपेठा सकाळी ८ ते १ या वेळेत खुल्या करण्यास परवानगी मिळाली आहे.आत्तापर्यंत मेडिकल, किराणा, भाजीपाला, फळविक्री अशी मोजकीच दुकाने सुरू होती. परंतु आता ब्युटीपार्लर, सलून आणि बिअर बार वगळून सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

त्यामुळे दीड महिन्यांपासून खरेदी खोळंबलेल्या ग्राहकांनी कापड दुकान, चप्पल दुकान, गॅरेज, स्टेशनरी, भांडी दुकान यासह विविध दुकानांमध्ये एकच गर्दी केली. गर्दीचे चित्र सर्वच बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत होते. स्थानिक प्रशासनाकडून बाजारपेठांचे सर्व्हेक्षण सुरू आहे.या सर्व्हेक्षणाअंती कोणती दुकाने कोणत्या वेळी ठेवावीत याबाबत अतिंम निर्णय घेण्यात येणार आहे. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...