agriculture news in marathi, marriage in fodder camp,nagar, maharashtra | Agrowon

जनावरांच्या छावणीत बांधली गेली ‘रेशीमगाठ’
सुर्यकांत नेटके
रविवार, 21 एप्रिल 2019

दुष्काळी परिस्थितीने शेतकरी हैराण आहेत. त्यात लग्नकार्याचा मोठा खर्च आहे. त्यामुळे आम्ही गरीब कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न छावणीत करण्याचा निर्णय घेतला. यामुळे समाधान मिळाले. शेतकऱ्यांनी अशा दुष्काळी परिस्थितीत साध्या पद्धतीने लग्न करण्यावर भर देणे गरजेचे आहे.
- विठ्ठलराव वाडगे, छावणीचालक, मांडवगण, ता. श्रीगोंदा.

नगर : दुष्काळ पाचवीलाच पूजलेला, पिण्याचे पाणी नसताना जनावरे कशी जगवायची, हा प्रश्‍न सध्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाला पडला आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी (ता. १८) मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथील जनावरांच्या छावणीत गरीब कुटुंबातील मुला-मुलीचा विवाह करीत वेगळा आदर्श निर्माण केला गेला आहे. या उपक्रमासाठी छावणीचालकांनी पुढाकार घेतला तर मंडप व जेवणाचा खर्च छावणीकडून केला गेला. 

सीना नदी आणि पुणे जिल्ह्यामधील कुकडीच्या पाण्याचे वरदान लाभलेला श्रीगोंदा तालुक्यातील बहुतांश भाग यंदा दुष्काळाने होरपळत आहे. दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करणारा मांडवगण हा भागदेखील या स्थितीला अपवाद नाही. माणसे कशीही जगतील; मात्र मुकी जनावरे जगविण्यासाठी धडपड सुरू असणाऱ्या तेथील लोकांचे जिणे मुश्‍कील झाले आहे. अशा वातावरणात तेथे वृद्धेश्‍वर मल्टिस्टेट सोसायटीचे संस्थापक विठ्ठलराव वाडगे यांच्या पुढाकाराने जनावरांची छावणी सुरू झाली. येथे ८१३ जनावरे आहेत. 

छावणीत जाधव परिवाराचीही जनावरे आहेत. मांडवगण येथील किसन नाना जाधव यांचे चिरंजीव अनिल व औरंगाबाद येथील मारुती देवराम वानखेडे यांची कन्या पूजा यांचा विवाह जुळला. मुलाला वडील नाहीत, तर मुलीला आई नाही. घरची आर्थिक स्थिती एकदम बेताची आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याच्या हेतूने वाडगे यांनी छावणीतच लग्न सोहळा उरकण्याचा आग्रह धरला. मंडप आणि जेवणावळीचा खर्च छावणीमार्फत करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही बाजूकडील मंडळी तयार झाली.

मुलगी औरंगाबाद जिल्ह्यामधील असली तरी लग्न मांडवगणला आणले आणि शेतकरी, कष्टकरी कामगारांसह पशुधनाच्या उपस्थितीत अनिल आणि पूजा यांची रेशीमगाठ बांधली गेली, असे महेश तोगे यांनी सांगितले. या छावणीचालकांचे १ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याचे नियोजन असून शेतकऱ्यांनी त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...