agriculture news in marathi, marriage in fodder camp,nagar, maharashtra | Agrowon

जनावरांच्या छावणीत बांधली गेली ‘रेशीमगाठ’
सुर्यकांत नेटके
रविवार, 21 एप्रिल 2019

दुष्काळी परिस्थितीने शेतकरी हैराण आहेत. त्यात लग्नकार्याचा मोठा खर्च आहे. त्यामुळे आम्ही गरीब कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न छावणीत करण्याचा निर्णय घेतला. यामुळे समाधान मिळाले. शेतकऱ्यांनी अशा दुष्काळी परिस्थितीत साध्या पद्धतीने लग्न करण्यावर भर देणे गरजेचे आहे.
- विठ्ठलराव वाडगे, छावणीचालक, मांडवगण, ता. श्रीगोंदा.

नगर : दुष्काळ पाचवीलाच पूजलेला, पिण्याचे पाणी नसताना जनावरे कशी जगवायची, हा प्रश्‍न सध्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाला पडला आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी (ता. १८) मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथील जनावरांच्या छावणीत गरीब कुटुंबातील मुला-मुलीचा विवाह करीत वेगळा आदर्श निर्माण केला गेला आहे. या उपक्रमासाठी छावणीचालकांनी पुढाकार घेतला तर मंडप व जेवणाचा खर्च छावणीकडून केला गेला. 

सीना नदी आणि पुणे जिल्ह्यामधील कुकडीच्या पाण्याचे वरदान लाभलेला श्रीगोंदा तालुक्यातील बहुतांश भाग यंदा दुष्काळाने होरपळत आहे. दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करणारा मांडवगण हा भागदेखील या स्थितीला अपवाद नाही. माणसे कशीही जगतील; मात्र मुकी जनावरे जगविण्यासाठी धडपड सुरू असणाऱ्या तेथील लोकांचे जिणे मुश्‍कील झाले आहे. अशा वातावरणात तेथे वृद्धेश्‍वर मल्टिस्टेट सोसायटीचे संस्थापक विठ्ठलराव वाडगे यांच्या पुढाकाराने जनावरांची छावणी सुरू झाली. येथे ८१३ जनावरे आहेत. 

छावणीत जाधव परिवाराचीही जनावरे आहेत. मांडवगण येथील किसन नाना जाधव यांचे चिरंजीव अनिल व औरंगाबाद येथील मारुती देवराम वानखेडे यांची कन्या पूजा यांचा विवाह जुळला. मुलाला वडील नाहीत, तर मुलीला आई नाही. घरची आर्थिक स्थिती एकदम बेताची आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याच्या हेतूने वाडगे यांनी छावणीतच लग्न सोहळा उरकण्याचा आग्रह धरला. मंडप आणि जेवणावळीचा खर्च छावणीमार्फत करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही बाजूकडील मंडळी तयार झाली.

मुलगी औरंगाबाद जिल्ह्यामधील असली तरी लग्न मांडवगणला आणले आणि शेतकरी, कष्टकरी कामगारांसह पशुधनाच्या उपस्थितीत अनिल आणि पूजा यांची रेशीमगाठ बांधली गेली, असे महेश तोगे यांनी सांगितले. या छावणीचालकांचे १ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याचे नियोजन असून शेतकऱ्यांनी त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

इतर बातम्या
देशात सोयाबीन लागवडीत ११ टक्के घटनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...
भारताची चंद्राला पुन्हा गवसणी;...श्रीहरिकोटा : चंद्राच्या अप्रकाशित भागावर प्रकाश...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशात...नगर ः नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन...
व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादकांची तीन...नाशिक: ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या...
‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत शेतकरी...मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर...
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत `...अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा...
कृषी विभागाकडून परीक्षा शुल्क परतीसाठी...अमरावती ः परीक्षा शुल्क परतीसाठी पोस्टेज खर्च सात...
सूतगिरण्या तीन दिवस बंद करण्याची वेळजळगाव ः चीन, युरोपातील सूत निर्यात जवळपास ठप्प...
राज्यात अवघा २५ टक्के पाणीसाठापुणे : जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप...
वणव्यामुळे पतंग, वनस्पतींच्या प्रजाती...जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्याचे परागीकरण करणाऱ्या...
दुष्काळी स्थितीमुळे संत्रा बागांचे...शेलूबाजार जि. वाशीम ः निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे...
नांदेड, परभणी जिल्ह्यांतील अकरा मंडळांत...नांदेड :  नांदेड, परभणी जिल्ह्यांतील ११...
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे निम्मी भरली कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
नाशिक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमननाशिक : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे...
वाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७...वाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र...
रत्नागिरीतील आठ धरणांची होणार तपासणीरत्नागिरी : ‘‘तिवरे धरण फुटल्यानंतर जिल्ह्यातील...
साक्री तालुक्यात दुष्काळाची शक्यतासाक्री, जि. धुळे : पाण्याचे स्रोत आटत आहेत. पाऊस...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...