शहीद संग्राम पाटील यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान संग्राम पाटीलयांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. २३) निगवे खालसा (ता. करवीर) येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांच्या आणि लष्कराच्या आठ जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली.
 शहीद संग्राम पाटील यांच्यावर लष्करी  इतमामात अंत्यसंस्कार Martyr Sangram Patil was cremated in a military crematorium
शहीद संग्राम पाटील यांच्यावर लष्करी  इतमामात अंत्यसंस्कार Martyr Sangram Patil was cremated in a military crematorium

कोल्हापूर  : शहीद जवान संग्राम पाटील  यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. २३) निगवे खालसा (ता. करवीर) येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  पोलिसांच्या आणि लष्कराच्या आठ जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली.

   पालकमंत्री तथा माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलीक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. शहीद जवान पाटील यांचे पार्थिव सकाळी साडेसहाच्या सुमारास कोल्हापूरहून निगवे खालसाकडे नेण्यात आले. या मार्गावरील गावांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती.ठीक-ठिकाणी श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते. ग्रामस्थांकडून पुष्प वाहून आदरांजली वाहण्यात येत होती. निगवे खालसा येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव काहीकाळ अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. या ठिकाणी कुटुंबीय आणि नातेवाइकांनी दर्शन घेतले. या नंतर या ठिकाणाहून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. चौका-चौकात फलक लावून आदरांजली वाहिली होती. ग्रामस्थ, विद्यार्थी-विद्यार्थिनी पुष्पहार आणि फुले वाहून आदरांजली वाहत होते. ‘अमर रहे अमर रहे संग्राम पाटील  अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com