Agriculture news in Marathi Martyrs of the movement should be given financial compensation: Rahul Gandhi | Agrowon

आंदोलनातील शहिदांना आर्थिक भरपाई द्यावी ः राहुल गांधी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 डिसेंबर 2021

कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार मिळावा, त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक भरपाई आणि रोजगार मिळावा, अशी मागणी कॉँग्रेस नेते राहुल गांधींनी मंगळवारी (ता. ७) लोकसभेत शून्य काळात केली.

नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार मिळावा, त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक भरपाई आणि रोजगार मिळावा, अशी मागणी कॉँग्रेस नेते राहुल गांधींनी मंगळवारी (ता. ७) लोकसभेत शून्य काळात केली. या वेळी पंजाब आणि हरियानामधील मृत शेतकऱ्यांची यादी सभापटलावर ठेवून सरकारला लक्ष्यही केले. 

मागील आठवड्यात लोकसभेमध्ये कॉँग्रेसच्या तसेच अन्य पक्षांच्या खासदारांनी शेतकरी आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक भरपाईबद्दल प्रश्‍न उपस्थित केला होता. या प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सरकारकडे मृतांची नोंद नसल्याने भरपाईचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही असे स्पष्ट केले होते. त्यानंतर राहुल गांधींनी पंजाब सरकारकडे या शेतकऱ्यांची नोंद असून, केंद्र सरकारने या यादीची पडताळणी करून भरपाई द्यावी, अशी मागणी केली होती. तसेच ही यादी संसदेच्या पटलावर ठेवणार असल्याचेही जाहीर केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर आज राहुल गांधी यांनी शून्य काळात हा मुद्दा उपस्थित केला. 

ते म्हणाले, की शेतकरी आंदोलनात ७०० शेतकरी शहीद झाले हे संपूर्ण देशाला माहिती आहे. पंतप्रधानांनी चूक मान्य करून देशाची आणि शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. शेतकरी आंदोलनातील बळींची नोंद नसल्याचे कृषिमंत्र्यांनी ३० नोव्हेंबरला सांगितले होते. याबाबत माहिती जमा केली असता पंजाब सरकारने जवळपास ४०० मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये भरपाई दिली आहे. त्यातील १५२ जणांना रोजगार दिला. या व्यतिरिक्त हरियानातील ७० शेतकऱ्यांची वेगळी यादी बनविली आहे, असे सांगत राहुल गांधींनी या याद्या सभा पटलावर ठेवत असल्याचे सांगितले. तसेच सरकारवर बोचरी टीकाही केली. ते म्हणाले, की पंतप्रधानांनी माफी मागितली आणि सरकार म्हणते, की कोणीही शेतकरी शहीद झाला नाही त्यांची नावेही नाहीत. आमच्याकडे नावे आहेत. या शेतकऱ्यांचा अधिकार आहे त्यांना मिळायला हवा आणि त्यांना रोजगार व भरपाई मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

दरम्यान, या नंतर राहुल गांधींनी सत्याग्रही शहीद शेतकऱ्यांच्या नावाने भरपाई न देणे, नोकरी न देणे आणि अन्नदात्यांविरुद्धचे गुन्हे मागे न घेणे या घोडचुका ठरतील. अखेर, पंतप्रधान किती वेळा माफी मागतील, असे खोचक ट्विटही केले.


इतर अॅग्रो विशेष
Weather Alert : थंडीची लाट 'या'...देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन दिवस...
भारताच्या गहू निर्यातीची घोडदौड वेगात दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील वाढत्या...
Top 5 News: वऱ्हाडात तुरीची आवक वाढली1. देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन...
ज्वारीच्या राखणीसाठी कणसाला संरक्षण नेवासे, जि. नगर : रब्बी हंगामातील ज्वारी आता...
मध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल...पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या...
उत्तर महाराष्ट्राला थंडीचा विळखा पुणे : उत्तर भारतातील गोठविणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे...
राज्यातील ५१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना...मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रजासत्ताक...
‘सीडी रेशो’ घसरलेल्या  जिल्ह्यांमध्ये...पुणे ः कर्जवाटप व ठेवीचे गुणोत्तर (सीडी रेशो)...
खराब झालेल्या सोलर  पॅनेलची नुकसान...गडचिरोली : धानोरा तालुक्यातील गिरोला येथील सुरेश...
रब्बी हंगामात ज्वारी घटली; हरभऱ्याची...पुणे : राज्यात रब्बीच्या ९८ टक्के पेरा पूर्ण झाला...
डिजिटल सात-बारा प्रकल्पातून जगताप यांची...पुणेः देशात चर्चित ठरलेल्या डिजिटल सात-बारा...
बाजारपेठेत नव्या बेदाण्याची प्रतीक्षा सांगली ः गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याला...
ऊसतोडणी रखडल्याने वैभववाडी, उंबर्डेत...सिंधुदुर्गनगरी ः वैभववाडी तालुक्यातील नादुरूस्त...
साताऱ्यात कृषिपंपांची वीज तोडणीचा धडाकासातारा : गेल्या १५ दिवसांपासून ग्रामीण भागात...
विविध वाण, तंत्रवापरातून दर्जेदार...वढोदा (ता.चोपडा, जि.जळगाव) येथील संदीप पाटील...
राज्यात थंडीची लाट पसरणार :...पुणे : पाकिस्तान मार्गे देशाच्या पश्चिम...
गरीब कुटुंबांच्या उत्पन्नात ५३...आर्थिक उदारीकरणानंतर (Economic liberalization)...
आंबा, काजू हंगाम उशिरा सुरू होण्याचा...  वृत्तसेवा - गेल्या आठवड्याच्या शेवटी...
खाद्यतेलातील तेजीचा  सोयाबीनला लाभ...पुणेः देशात पामतेलाची उपलब्धता कमी असल्याने...
तापमानात घट; द्राक्ष मण्यांना तडे नाशिक : रविवारी (ता.२३) रोजी सकाळपासूनच धुके आणि...