agriculture news in Marathi massive crop damage by rain Maharashtra | Agrowon

किती अन् काय सांगावं...हात टेकलेत आमचे

संतोष मुंढे
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

कुणाला किती अन् काय सांगावं...सततच्या पावसाने कंटाळून गेलाय शेतकरी...हात टेकलेत आमचे... सरकारनं लक्ष घालावं.

जालना : कुणाला किती अन् काय सांगावं...सततच्या पावसाने कंटाळून गेलाय शेतकरी...हात टेकलेत आमचे... सरकारनं लक्ष घालावं...वरुड येथील द्राक्ष उत्पादक गणेश म्हस्के अतिवृष्टीने झालेल्या व होत असलेल्या नुकसानीची व्यथा मांडत होते. ही व्यथा मांडत असतानाच पावसाची रिपरिप सुरू झाली, अन्‌ त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळणेच बाकी होते. 

श्री. म्हस्के म्हणाले, ‘‘आमच्या परिसरात कडवंची, वरुड, धारकल्याण, पिरकल्याण, इंदापूर या प्रमुख गावशिवारांसह इतरही ठिकाणी द्राक्ष बागांचा विस्तार झाला आहे. यंदा एका बागांवर सव्वा लाख खर्च झाले. पण घड जिरण्याचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. शिवाय डाऊनीचा प्रादुर्भावही मोठा आहे. गेल्या हंगामात लॉक डाऊनने मारले. आता पाऊस सुचू देईना. अनेकांच्या बागेतील घड जिरलेत, त्यामुळे नुकसान अटळ आहे. मायबाप सरकारनं भविष्यातील नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन दखल घ्यावी.’’ 

जालना जिल्ह्यात पावसाची सरासरी ६०३.१ मिलिमीटर इतकी आहे. २१ ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यात प्रत्यक्षात १०२७.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सतत व अतिवृष्टी रूपातील पावसाने यंदाच्या खरिपाची दाणादाण केली आहे. मूग, उडीद, हातचे गेले, कपाशीवर संक्रांत आली. फळपिकांची वाताहात झाली, द्राक्षाचं भविष्य अंधकारमय झालं. 

सव्वाचार लाख हेक्टर क्षेत्र बाधित 
जालना जिल्ह्यात यंदा ६ लाख ५५ हजार ३३७ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. यापैकी जवळपास ५ लाख १६ हजार ६४७ शेतकऱ्यांच्या ४ लाख २५ हजार २०५ हेक्टर क्षेत्राला जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाचा दणका बसला. भरपाईसाठी ३१४ कोटी ९१ लाख ९३ हजार ३३३ रुपयांची गरज आहे. 

मोठ्या प्रमाणात जमीन खरडली 
जालना जिल्ह्यातील बदनापूर, मंठा, अंबड व घनसावंगी याच्या तालुक्यातील ८ हजार ६१३ शेतकऱ्यांची जवळपास २ हजार ५३७ हेक्टर ८२ गुंठे जमीन अति पाऊस व पुरामुळे खरडून गेली आहे. जमिनीच्या दुरुस्तीसाठी शासन निर्णयाप्रमाणे प्रतिहेक्‍टरी ३७ हजार ५०० प्रमाणे ९ कोटी ५१ लाख ६८ हजार २५० रुपयांची गरज आहे. 
 
३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्र 
जिरायती क्षेत्र :
३९७४३१.०६ हेक्टर 
शेतकरी संख्या: ४७५८०२ 
अपेक्षित निधी(हेक्टरी ६८००) :२७०,२५,३१,२०८ 

बागायती क्षेत्र: १११०० हेक्टर 
शेतकरी संख्या: १७०३८ 
अपेक्षित निधी (हेक्टरी १३५००) : १४,९८,५६,८२५ 

फळपिक क्षेत्र : १६४८९.१८ 
शेतकरी संख्या : २३८०७ 
अपेक्षित निधी (हेक्टरी १८०००) : २९,६८,०५,२४० 

पीकनिहाय नुकसानीचे क्षेत्र(हेक्टरमध्ये) 
जिरायती पिके 
कापूसः १९५१६०.७७ 
मकाः ६६२८.४८ 
बाजरीः १०४०५ 
मूगः ५२११२.४७ 
तूरः १९२०९.४९ 
उडिदः ९७२२.२ 
सोयाबीनः १०२२५६.३९ 
इतरः १९३६.३८ 

बागायती पीके 
मिरचीः
७०६६.६५ 
कांदाः १७३.९५ 
भाजीपालाः १०९३.२७ 
ऊसः १३८० 
इतरः १३८६ 
 
फळपीक 
द्राक्षः ७७७.१४ 
पपईः ४०४.६६ 
डाळिंबः २९१५.३३ 
पेरूः ६९.८१ 
मोसंबीः ११८३५.२७ 
चिकूः ६४.४० 
संत्राः २ 
सीताफळः ३४.३३ 
लिंबूः ३९.९० 
केळीः ३९.५० 

प्रतिक्रिया
चार एकर कपाशीत आंतरपीक मूग घेतला, त्याच खत झालं आणि क्विंटल कापूस हाती आला. आणखी तीन चार क्विंटल येईल, पण तो बी भिजला. मकातून अजून पाणी वाहतय. 
- प्रकाश शिंदे, वरुडी, ता. बदनापूर, जि. जालना 

जिथं ५०० ते ६०० कॅरेट सीताफळ निघायला हवे, तिथं १२५ कॅरेट निघाले, एकाच वेळी सीताफळ आल्याने दरानेही मारलं. पावसानं शाश्वत सीताफळाचीही दाणादाण केली. 
- प्रकाश उबाळे, नंदापूर, ता. जि. जालना 

तीन एकरात ३५ हजार खर्च केल्यावर साडेसात क्विंटल सोयाबीन झालं. दर्जा चांगला नाही. तुरीला काय घडल ते सांगता येणार नाय. लाखभर रुपये बँकेतून पीक कर्ज काढून लावले. 
- बद्रीनाथ शिंदे, वरुडी, ता. बदनापूर, जि. जालना 

गेल्या वर्षी द्राक्ष बागेवर सव्वा लाख खर्च केले. परतीच्या पावसानं पूर्ण बागेतील घड जिरून गेले. त्याचा विमा बँकेत आला, पण मला अजून मिळाला नाही. यंदा ४० टक्के फटका बसलाय. 
- संजय उबाळे, नंदापूर, ता. जि. जालना. 
 


इतर अॅग्रो विशेष
‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी...औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन...
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढपुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या...
कमी कालावधीत पक्व होणारे मधुर कलिंगड...नाशिक : बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन...
किमान तापमानात घट होणार पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार...
डाळिंब दरात मोठी सुधारणासांगली ः राज्यातील डाळिंब पीक यंदा सततचा पाऊस आणि...
पामतेल आयात शुल्कात कपात; केंद्र...नवी दिल्ली ः केंद्र सरकारने कच्च्या...
टंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...
'निवार’ चक्रीवादळाचा प्रभाव; राज्यात...पुणे ः बंगालच्या उपसागरात पूर्व किनाऱ्याकडे...
केळीची मागणी कायम, दर टिकून जळगाव : दाक्षिणात्य व गुजरातमधील केळीची उत्तर...
तमिळनाडू, पुद्दुचेरीत धुमाकूळचेन्नई  ः निवार चक्रीवादळामुळे वेगवान...
गहू, हरभरा पेरणीला वेगपुणे : यंदा चांगल्या पाणीसाठ्यामुळे गहू व...
पहिल्याच टप्प्यात थकवली ३५० कोटींची ‘...पुणे : राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर...
आर्थिक चणचण,‘लम्पी’चे पशुधन बाजारावर...सांगली ः लॉकडाउनमुळे पशुधानाचे आठवडे बाजार तब्बल...
ऊसतोडणी मजुरांची संख्या यंदा दोन...नगर : राज्यातील साखर कारखान्यांवर ऊसतोडणी...
पणन महासंघाची खरेदी उद्यापासूननागपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
मराठवाड्यातील बहुतांश धरणे तुडुंबऔरंगाबाद : यंदा जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील...
संकटकाळात श्री ब्रॅण्डद्वारे दर्जेदार...नाशिक जिल्ह्यातील वनसगाव येथील शैलेश व संदीप या...
सणांच्या हंगामात भाव खाणारी गाडे यांची...कांजळे (ता. भोर, जि. पुणे) येथील विलास गाडे यांनी...
महाटीत उपसरपंचपदासाठी साडेदहा लाखांची...नांदेड ः ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी उपसरपंचपदाचा...
राज्यात शनिवारपासून ‘जनप्रबोधन यात्रा’नगर/पुणे ः शेतकरी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या...