Agriculture news in Marathi Massive relief should be given to the affected farmers | Agrowon

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात यावी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 डिसेंबर 2021

पावसामुळे संत्रा, मोसंबी, सोयाबीन, कपाशी, तूर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

जलालखेडा, जि. नागपूर : खरीप हंगाम सन २०२१-२२ ला सततच्या पावसामुळे संत्रा, मोसंबी, सोयाबीन, कपाशी, तूर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

खरीप हंगाम २०२१-२२ ला सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक शेंगा भरल्यानंतर सोयाबीनला कोंब फुटून सडल्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास १०० टक्के नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे कपाशीचे बोंड जवळपास ६० टक्के सडले. त्यामुळे कपाशीचे पण ६० टक्के नुकसान झाले आहे. जिल्ह्यात संत्रा व मोसंबी मोठ्या प्रमाणात आहे. या वर्षी संत्रा व मोसंबीमध्ये ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये बुरशीमुळे जवळपास ६० टक्के गळ झाली आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्याचा सर्वे होऊन प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. मागच्या वर्षी २०२०-२१ ला पण सोयाबीनवर रूट रॉट व येलो मोझॅक या बुरशीमुळे या जिल्ह्यातील सोयाबीन भरले नव्हते. 

त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे या क्षेत्रातील मोसंबीमध्ये ब्राऊन फूट रॉट या बुरशीने जवळपास ७० टक्के नुकसान झाले होते. या नुकसानीचा राज्य शासनाने सर्वे केला होता. कृषी सचिव एकनाथ डवले यांनी पण या सोयाबीन व मोसंबी गळच्या क्षेत्राला भेट दिली होती व सर्वेचा आदेश दिला होता. सर्वेक्षण होऊन अहवाल पाठवून निधीची मागणी ही राज्य शासनाला करण्यात आली होती. पण लगतच्या अमरावती जिल्ह्याला सोयाबीन व संत्रा व मोसंबी गळकरिता अनुदान देण्यात आले. पण नागपूर जिल्ह्याला अजून मदत मिळाली नाही. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकरी असंतुष्ट आहे.

अंमलबजावणी व्हावी! 
शरद पवार यांनी १४ नोव्हेंबर २०२० ला जिल्ह्यात ओला दुष्काळ पाहणी दौरा केला होता. त्यानंतर रविभवन येथे संत्रा व मोसंबीच्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधून या पिकाच्या अडचणीबद्दल व मार्केटिंग बद्दल चर्चा करताना चीनमध्ये संत्रा विकता येईल म्हणून सांगितले होते. याकरिता एक संत्र्याची कमेटी करण्याकरिता सांगितले. पण त्यानंतर कोरोना आल्यामुळे तो प्रश्‍न प्रलंबित आहे व कमेटी पण झाली नाही. तरी यावर संत्रा व मोसंबी या फळपीकमध्ये काम करण्याऱ्यासोबत पुन्हा चर्चा करून तोडगा काढावा, अशी ही मागणी निवेदनात नागपुरी संत्रा कंपनीचे अध्यक्ष मनोज जवंजाळ, सचिव स्वप्नील धोटे यांच्यासह डॉ. अनिल ठाकरे, भूपेंद्र चरडे, अनुप खराडे यांनी केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील तीन हजार कामे...पुणे : जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या शंभर दिवस...
जालन्यात गहु सोंगणीला सुरुवातपिंपळगाव रेणुकाई, जि. जालना : पिंपळगाव रेणुकाईसह...
बांबू प्रक्रियेसाठी कौशल्याची आवश्यकता...दापोली, जि. रत्नागिरी ः ‘‘विस्तार शिक्षण...
शेळी, मेंढीपालन व्यवसाय म्हणजे ‘एटीएम’...दोंडाईचा, जि. धुळे : कष्टकरी शेळी-मेंढीपालन...
ड्रॅगन फ्रूटची कलमे आगीत भस्मलांजा, जि. रत्नागिरी ः तालुक्यातील धुंदरे येथे डॉ...
नगर जिल्ह्यासाठी ५४० कोटी रुपयांचा निधी...नगर : नगर जिल्हा वार्षिक योजनेत २०२२-२३ या आर्थिक...
‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३०...औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (...
सोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’तमाळीनगर, जि. सोलापूर ः यंदाच्या गाळप हंगामात...
जळगावात पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत रब्बी...जळगाव ः जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
मिनी विधानसभेच्या निवडणुका मार्चमध्ये...मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील १४...
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...