Agriculture News in Marathi Materials under Honey Center Scheme 50% grant in the form of | Page 4 ||| Agrowon

मध केंद्र योजनेंतर्गत साहित्य  स्वरूपात मिळणार ५० टक्के अनुदान 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येत आहे.

नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मध केंद्र योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुतंवणूक यावर आधारित आहे. शासनाच्या हमी भावाने मध खरेदी विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती इत्यादींचा समावेश असणार आहे. 

जिल्ह्यातील पात्र व्यक्ती किंवा संस्थांनी अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे. वैयक्तिक मधपाळ या घटकातील अर्जदार हा साक्षर असून, त्याचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावे. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

याकरिता १०दिवसांचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे केंद्र चालक प्रगतिशील मधपाळ या घटकासाठी वयोमर्यादा २१ वर्षे व किमान १० वी पास व सदर घटकाचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान १ एकर शेती जमीन किंवा भाडे तत्त्वावर घेतलेली शेतजमीन असणे आवश्यक आहे. या बरोबरच लाभार्थ्यांकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असणे आवश्यक आहे, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. 

केंद्र चालक संस्था या घटकासाठी संस्था नोंदणीकृत व संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्त्वावर घेतलेली किमान १ हजार चौरस फूट सुयोग्य इमारत असावी. या बरोबरच एक एकर शेतजमीन स्वमालकीची किंवा भाड्याने घेतलेली व संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवा असावी. विशेष छंद प्रशिक्षण या घटकांतर्गत २५ रुपये प्रवेश शुल्क भरणे आवश्यक आहे. शाळा, कॉलेजातील विद्यार्थी, नोकरदार किंवा सेवानिवृत्त कर्मचारी, वयोवृद्ध अशा इच्छुक लाभार्थ्यांनी ५दिवस प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे.

शास्त्रीय पद्धतीने आग्या मध संकलन प्रशिक्षणासाठी लाभार्थीं साक्षर असावा व वयोमर्यादा १८ ते ५० वर्ष असणे आवश्यक आहे. तसेच या घटकासाठी किमान ५ दिवसांचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. योजनेंतर्गत लाभार्थ्यांची प्रशिक्षण घेण्यासाठीची निवड मंडळामार्फत निश्चित केलेल्या ठिकाणी घेण्यात येणार असून, प्रशिक्षण घेण्यापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्याबाबत मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य असणार आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा 
या बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, रूम नं. १६, तिसरा मजला, उद्योग भवन, आय.टी.आय. सिग्नल जवळ, सातपूर, नाशिक ७, दूरध्वनी क्र.०२५३–२३५२७३६ तसेच संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं.५, मु. पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा-४१२८०६, दूरध्वनी-०२१६८–२६०२६४ यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. 
 


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात पाणीपातळीत वाढजळगाव ः नवरात्रोत्सवानंतर जिल्ह्याला परतीच्या...
सोलापूर जिल्ह्यात यंदा हंगामात तीन लाख...सोलापूर ः जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू झाला आहे....
हमीभाव खरेदी केंद्राचा चेंडू राज्य...नागपूर ः भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून...
जळगाव जिल्हा बँकेत  मविआ विरूद्ध भाजप...जळगाव : काँग्रेसने भाजपसोबत सर्वपक्षीय पॅनलमध्ये...
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाअकोला ः मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम,...
हेकेखोर विमा कंपन्यांनी वेठीस धरलेपुणे ः शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी...
ओल्या दुष्काळाची घोषणा करा अकोला : विदर्भ, मराठवाड्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणांतून विसर्ग बंदपुणे : परतीचा पाऊस राज्यातून परतल्याने पावसाने...
राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
नगर जिल्ह्यात निम्म्या सोयाबीनची नासाडीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात...
मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा दाणादाणनाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या झळा शेतकरी सोसत...
अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार :...नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारने आपसात काय गोंधळ...
सरकार साखर उद्योगासह ऊस उत्पादकांच्या...सोलापूर ः ‘‘साखर उद्योग शेतकऱ्यांचा आहे....
सोलापूर जिल्ह्यात ऊसबिलाची थकबाकी मिळेनासोलापूर ः जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामाला सुरवात...
आदिवासी वस्तीच्या पुनर्वसनासाठी लवकर...नाशिक : ‘‘शेतकरी असो वा शेतमजूर यांची प्रगती कशी...
खानदेशात पावसाने सोयाबीन, कापसाचे नुकसानजळगाव: खानदेशात अनेक भागात शनिवारी (ता. १६)...
जळगाव : वाघूर प्रकल्पग्रस्तांना...शेंदुर्णी, जि. जळगाव : वाघूर प्रकल्पासाठी २००५...
जालना बांबू लागवडीचे देशातील मोठे...जालना : ‘‘उद्योजकांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद...
सिंधुदुर्गमध्ये सरासरीच्या ९० टक्के... सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आतापर्यंत ४०५२ मिमी...
वाहतुकदारांच्या समस्या सोडविणार :... मुंबई : कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या...