तोंडापूर १०० टक्के भरले, हतनूरचे आठ दरवाजे उघडले

तोंडापूर १०० टक्के भरले, हतनूरचे आठ दरवाजे उघडले
तोंडापूर १०० टक्के भरले, हतनूरचे आठ दरवाजे उघडले

जळगाव ः खानदेशात सर्वत्र कमी-अधिक पाऊस झाल्याने प्रकल्पांमधील जलसाठाही वाढला आहे. जामनेर (जि. जळगाव) तालुक्‍यातील तोंडापूर प्रकल्प १०० टक्के भरला आहे. तर तापी नदीवरील मुक्ताईनगरनजीकच्या हतनूर धरणाचे आठ दरवाजे अर्धा मीटरने शनिवारी (ता. २७) सकाळी नऊ वाजता उघडण्यात आले.  काही प्रकल्पांमधील जलसाठा वाढला आहे, तर काही प्रकल्प मात्र कोरडेच आहेत. जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील मन्याड, बोरी, अंजनी, बहुळा, भोकरबारी हे प्रकल्प कोरडेच आहेत. तर अग्नावती व हिवरा प्रकल्पातील साठाही फारसा वाढलेला नाही. गिरणा धरणात ७.५७ टक्के जलसाठा शनिवारी सकाळी होता. तर रावेर तालुक्‍यातील अभोरा, मंगरूळ, सुकी प्रकल्पातही फारसा साठा वाढला नसल्याची माहिती मिळाली. अभोरामध्ये ३३.९२, मंगरूळमध्ये ३.५३ तर सुकी प्रकल्पात २५.८३ टक्के जलसाठा आहे. धुळे जिल्ह्यातील सातपुडा पर्वतालगतच्या शिरपूर तालुक्‍यातील अनेर प्रकल्पतील साठाही शून्यच टक्केच होता. तर धुळे तालुक्‍यातील पांझरा नदीवरील पांझरा प्रकल्पाचा साठाही १.६० टक्‍के होता. जलसाठा फारसा न वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तापी नदीवरील हतनूर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने या नदीवरील धुळे जिल्ह्यातील सुलवाडे बॅरेज, नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाला. जामनेर तालुक्‍यातील वाघूर धरणातील साठाही किंचित वाढला असून, तो २४ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. गिरणा धरण जळगावच्या पश्‍चिम भागासाठी महत्त्वाचे आहे. मालेगाव, नांदगाव तालुक्‍यातून ही नदी जळगाव जिल्ह्यात चाळीसगावात येते. या नदीच्या उगम क्षेत्रासह धरणाच्या लाभक्षेत्रात जोरदार पाऊस नसल्याने गिरणा प्रकल्प भरलेला नाही. हा प्रकल्प भरावा, अशी आळवणी गिरणा पट्ट्यातील शेतकरी, ग्रामस्थ वरुणराजाला करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com