Agriculture news in marathi In a matter of priority, The choice is for another benefit | Agrowon

प्राधान्यक्रम एका बाबीला, निवड दुसऱ्याच लाभासाठी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 एप्रिल 2021

कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून ३ कोटी १८ लाखाचा वाढीव निधी मिळाल्याने नव्याने ३८१ लाभार्थींची निवड केली आहे.

 नगर : कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून ३ कोटी १८ लाखाचा वाढीव निधी मिळाल्याने नव्याने ३८१ लाभार्थींची निवड केली आहे. त्यासाठी मात्र ऑनलाइन अर्ज भरताना शेतकऱ्यांनी ज्या औजारासाठी प्राधान्य दिले होते. त्या ऐवजी दुसऱ्याच बाबीसाठी निवडी झाल्या आहेत. त्यामुळे प्राधान्यक्रमाने निवडी झाल्या नसल्याचे दिसत आहे. 

यंदा भरलेल्या अर्जात एकापेक्षा अनेक बाबी भरलेल्या असल्या तरी एका वर्षासाठी एकाच योजनेसाठी लाभ असेल. नव्याने पुढील वर्षासाठी त्याच अर्जात अपडेट करता येत आहे. नव्या वर्षासाठी (२०२१-२२) ऑनलाइन अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे. कृषी विभागाकडून मात्र ही बाब फारशी गांभिर्याने घेतली नाही. त्यामुळे आठ दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी अर्ज भरायला सुरुवात झाली हे नगर जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना कल्पना नाही. नगरचा कृषी विभागच मुळात शेतकऱ्यांबाबत बेफिकीर असल्याचे सातत्याने दिसून आले.  

शेतकऱ्यांना शेती औजाराचा लाभ देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून अनुदानाचा लाभ दिला जात आहे. यंदा यंदा तब्बल १ लाख ९१ हजार ८०६ शेतकऱ्यांनी शेती औजारांच्या अनुदानासाठी अर्ज केले होते. नगर जिल्ह्यासाठी सुरवातीला ६ कोटी ३२ लाखाचा निधी मिळाला. त्यातून ८५२ शेतकऱ्यांची अनुदानासाठी ऑनलाइन सोडतीतून निवड केली. त्यानंतर आता ३ कोटी १८ लाखाचा वाढीव निधी मिळाला असल्याने नव्याने ३८१ लाभार्थ्यांची निवड झाली असून, निवड झालेल्या शेतकऱ्यांना थेट वरिष्ठ पातळीवर मेसेज दिले आहे. मात्र संबंधित शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरताना ज्या बाबीला प्राधान्यक्रम दिले, त्या ऐवजी दुसऱ्याच बाबीसाठी निवड झाल्याचे मेसेजमुळे शेतकऱ्यांना कळले आहे. त्या बाबत कृषी विभागात चौकशी केली असता याबाबत येथील कार्यालयाला काहीही सांगता येत नाही. मात्र एका वर्षात एकच योजनेसाठी लाभ मिळेल. त्यानंतर दुसऱ्या वर्षासाठी अर्ज करताना त्यात अपडेट करता येते. आता आठ दिवसांपासून (१ एप्रिल) नव्याने अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे नव्या वर्षासाठी अर्ज भरण्याला १ एप्रिलपासून सुरवात झाली. मात्र शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात आली नाही.

सर्वाधिक मागणी ट्रॅक्टरला
नगर जिल्ह्यात यांत्रिकीकरणासाठी यंदा दरवर्षीच्या तुलनेत तीनपट अधिक अर्ज आले आहेत. त्यात ट्रॅक्टरसाठी ५६ हजार अर्ज आलेले असून, केवळ पंचवीस लोकांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. पूर्वी तालुका पातळीवर अवजारनिहाय सोडत निघायची. आता वरिष्ठ पातळीवरून ऑनलाइन सोडत निघते आहे. त्यामुळे सोडत काढण्याची पद्धत कशी, कोणता प्राधान्यक्रम लावून लाभार्थी निवडले जात आहेत याची कोणताही माहिती खुद्द कृषी विभागाच्या  वरिष्ठ आधिकाऱ्यांनाच नाही. त्यांनीही त्या बाबत फार गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही.


इतर अॅग्रो विशेष
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...
शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हजार कोटी जमा नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
मित्राच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मदतीचा...कोल्हापूर : एकेकाळी महाविद्यालयात एकत्र धमाल...
पाच हजार कोटींचा विमा कंपन्यांना नफा पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचे कवच...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
वेगवान वाऱ्याचा कोकण किनारपट्टीला फटका...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
विमा कंपन्यांना आयुक्तांचा दणका पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः देशात सध्या सोयाबीनचा मोठा तुटवडा जाणवत...