Agriculture news in marathi The maximum temperature began to rise | Agrowon

कमाल तापमान वाढण्यास सुरुवात 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 एप्रिल 2021

उन्हाचा चटका वाढू लागला असून, कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी (ता. १७) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे. उन्हाचा चटका वाढू लागला असून, कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी (ता. १७) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

गेल्या दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. तुरळक ठिकाणी अधूनमधून ढगाळ वातावरण होत आहे. मात्र आज, उद्यापासून ढगाळ वातावरणही निवळू लागेल. सध्या अजूनही काही प्रमाणात हवेत गारवा असल्याने कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश घट झालेली आहे. 

पुणे, मालेगाव, सातारा, मुंबई, अलिबाग, डहाणू, औरंगाबाद, बीड, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर भागांत कमाल तापमान सरासरी एवढे आहे. किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली. पुणे येथे सर्वांत कमी १८.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. 

सध्या विदर्भ ते तमिळनाडू, मराठवाडा आणि कर्नाटक या भागांत कमी दाबाचा पट्टा आहे. हा पट्टा समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. अरबी समुद्राचा आग्नेय भाग ते केरळ किनारपट्टी ते उत्तर कर्नाटक, दक्षिण कर्नाटक दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. तसेच मागील दोन दिवसांपासून ओडिशाच्या दक्षिण व उत्तर परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती कायम असून, ते ३.१ आणि ४.५ किलोमीटर उंचीवर आहे. 

केरळ व परिसरातही चक्रीय वाऱ्यांची स्थिती कायम आहे. उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, बिहार व परिसरातही काही प्रमाणात चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीचा प्रभाव आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उन्हाचा पारा वाढून पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...