agriculture news in Marathi, maximum temperature up, Maharashtra | Agrowon

राज्यात कमाल तापमानात आणखी वाढ

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 एप्रिल 2019

पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणातील उकाड्यात वाढ झाली आहे. यामुळे कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत उन्हाचा चटका आणखी वाढणार असून, उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत. शुक्रवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे ४४.० अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणातील उकाड्यात वाढ झाली आहे. यामुळे कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत उन्हाचा चटका आणखी वाढणार असून, उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत. शुक्रवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे ४४.० अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

 गुरुवारी व शुक्रवारी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. त्यामुळे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेल लक्षणीय वाढ झाली. विदर्भात काही भागात किंचित वाढ झाली. गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शुक्रवारी (ता. ५) दिवसभर उकाडा जाणवत होता. मात्र, उन्हाचा चटका हा नेहमीप्रमाणेच कायम होता. 

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र व कर्नाटकच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने गुरुवारी (ता. ४) अचानक सकाळपासून हवामानात बदल झाला होता. मात्र, शुक्रवारी या कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका चांगलाच वाढू लागला आहे. विदर्भातील बहुतांशी सर्वच शहरांचा पारा चाळीस अंशांच्या वर गेला आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. मराठवाड्यातही औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी या शहरांचा पारा ४२ ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. मध्य महाराष्ट्र व खान्देशातही उन्हाचा पारा ४३ अंशांपर्यंत गेला आहे. कोकणातही कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेलिअसच्या दरम्यान होता.   

शुक्रवारी (ता. ५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.५, नगर ४२.४, जळगाव ४३.०, कोल्हापूर ३७.१, महाबळेश्‍वर ३३.७, मालेगाव ४२.६, नाशिक ४०.४, धुळे ४२.२, सांगली ४०.४, सातारा ४०.३, सोलापूर ४१.३, सांताक्रुझ ३२.३, अलिबाग ३४.०, रत्नागिरी ३२.०, डहाणू  ३३.६, औरंगाबाद ४१.४, बीड ४१.८, नांदेड ४२.५, परभणी ४२.०, अकोला ४४.० (२६.०), अमरावती ४३.८ (२०.८), बुलडाणा ४१.२ (२४.८), ब्रह्मपुरी ४१.७ (२३.४), चंद्रपूर (२७.२), गडचिरोली ४०.२ (२३.०), गोंदिया ४०.० (२१.४), नागपूर ४१.२ (२६.५), वर्धा ४३.० (२७.६), वाशिम ४०.६ (२४.०), यवतमाळ ४२.० (२५.४).


इतर अॅग्रो विशेष
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...
साखर कारखान्यांना लवकरच ‘पॅकेज’मुंबई ः राज्यातील आजारी सहकारी साखर कारखान्यांना...
कमी दरात तूर घेऊन विकली हमीभावाने; दोन...यवतमाळ ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांकडून कमी दरात...
सेंद्रिय भाजीपाल्याला तयार केले ‘...झुलपेवाडी (जि. कोल्हापूर) येथील चिकोत्रा सेंद्रिय...
शेतकरीहितालाच हवे सर्वोच्च प्राधान्यसहकार क्षेत्रात पूर्वीपासूनच काँग्रेस,...
सोशल मीडिया आणि बॅंकिंग जगात आज कोट्यवधी लोक संवाद करणे आणि माहिती...
बीड जिल्ह्यातील चिंचवडगावमध्ये...बीड: थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे...
राज्यातील ५०० कार्यालयांत शेतकरी...मुंबई : शेतकरी बांधवांना अडचणी मांडण्यासाठी,...
ढगाळ हवामानामुळे गारठा कमीचपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव, ढगाळ...
राज्य खत समितीचा ‘रिमोट’ कोणाकडे?पुणे : शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी ‘...
महारेशीम अभियानांतर्गत पाच हजार एकरची...औरंगाबाद: रेशीम विभागाच्यावतीने राबविल्या जात...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी सामूहिक...नाशिक : देशातील कृषी व ऋषी संस्कृतीमध्ये काळ्या...
हार्वेस्टर मालकांकडून ऊस उत्पादकांची...सोलापूर ः ऊसतोडणीसाठी शेतकरी हार्वेस्टर मशिनला...
कुऱ्हा गावाने तयार केली भाजीपाला पिकांत...अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे तालुके संत्रा...