Agriculture news in Marathi Maximum temperature rise in Vidarbha | Agrowon

विदर्भात कमाल तापमानात वाढ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 मार्च 2021

कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. विदर्भात कमाल तापमानात वाढ होत असून, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी थंडी आहे.

पुणे ः कोरड्या हवामानामुळे उन्हाचा चटका वाढू लागल्याने कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. विदर्भात कमाल तापमानात वाढ होत असून, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी थंडी आहे. बुधवारी (ता. ३) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात १०.८ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

मध्य महाराष्ट्रात चक्रीय स्थितीचा प्रभाव कायम असल्याने काही भागात अंशतः ढगाळ वातावरण आहे. यामुळे उकाड्यात वाढ होत असल्याने किमान तापमानासह कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. विदर्भातील अकोला आणि चंद्रपूर भागांत उन्हाचा चटका वाढत आहे. त्यामुळे अकोला येथे बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या नोंदीनुसार कमाल तापमानाचा पारा ३९.५ अंशसेल्सिअसपर्यंत वाढला होता. तसेच चंद्रपूर येथे कमाल तापमान ३९.४ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदविले गेले होते. विदर्भात कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १६ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.  

सध्या राज्यातील अनेक भागांत सकाळपासून उन्हाचा पारा वाढत आहे. दुपारी चांगलाच चटका वाढल्याने कमाल तापमानात वाढ होत आहे. राज्यात अकोला, बुलडाणा, वर्धा या भागांत सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात जवळपास चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक भागांत उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. मराठवाड्यातही ऊन वाढत असल्याने कमाल तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

मध्य महाराष्ट्रातील तापमानात कमाल व किमान तापमानात चढ-उतार झाले आहेत. किमान तापमान तापमान १० अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. कोकणात थंडी कमी झाल्याने किमान तापमानाचा पारा २० ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.


इतर अॅग्रो विशेष
खतांची दरवाढ नाहीपुणे : रासायनिक खतांच्या किमतींमध्ये कोणत्याही...
खरिपाचे गावनिहाय नियोजन ः कृषिमंत्रीकोल्हापूर ः खरिपाचे नियोजन गावातच करण्यासाठी...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
राज्यात कृषिपंपधारकांकडून १,१६० कोटींचा...कोल्हापूर : कृषिपंप वीज धोरण योजनेअंतर्गत ११ लाख...
‘रोहयो’ शेततळ्यात प्लॅस्टिक...पुणे : रोजगार हमी योजनेतून शेततळे खोदण्यासाठी...
जोरदार पावसाची शक्यतापुणे : ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. तसेच...
प्राधान्यक्रम एका बाबीला, निवड दुसऱ्याच... नगर : कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी...
म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी : इरावडीइरावडी ही म्यानमारमधील सर्वांत मोठी आणि देशातील...
फुलशेतीतून सुखाचा बहर जिद्द, चिकाटी, मेहनत, ज्ञान व व्यावसायिक...
तळलेले गरे, फणसाची फ्रोझन भाजी, फणसाचे...फणस हे कोकणातील महत्त्वाचे मात्र दुर्लक्षित पीक...
अवकाळीचा आजपासून अंदाजपुणे : दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत ढगाळ...
लातूर, अकोल्यात तुरीने ओलांडला सात...लातूर/अकोला ः राज्यात काही दिवसांपासून तूर, हरभरा...
गावरानपेक्षा ब्रॉयलर चिकनला अधिक दरनगर ः राज्यात पहिल्यांदाच गावरान कोंबडीपेक्षा...
पशू बाजार बंद; शेतकरी बैल खरेदीसाठी...जळगाव ः खानदेशात गेल्या काही दिवसांपासून पशुधनाचे...
‘इफ्को’कडून खतांच्या किमतीत वाढपुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या...
खरीप, रब्बी पिकांसाठी पीककर्ज निश्चितीअमरावती : यंदाच्या खरीप व रब्बी हंगामासाठी...
बाजार समित्या टाकणार ‘कात’पुणे : पणन सुधारणांमुळे होणाऱ्या संपूर्ण...
ओल्या काजूगरासाठी प्रसिद्ध कुणकवणसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकवण (ता. देवगड) हे गाव...
‘बोअरवेल’ संकटाच्या खाईत नेणारी ः...पुणे : श्रीमंतीच्या हव्यासाने आपण जमिनीवरचे पाणी...
बीड जिल्हा बँकेवर अखेर पाच जणांचे...बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर बुधवारी...