agriculture news in Marathi may impact on seed availability due to employee strike Maharashtra | Agrowon

महाबीज’ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बियाणे उपलब्धतेवर परिणाम शक्य

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग व इतर मागण्यांसाठी सात डिसेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. 

अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग व इतर मागण्यांसाठी सात डिसेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. हा संप वाढल्यास पुढील हंगामासाठी बियाणे उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो, असा दावा संघटनेकडून केला आत आहे.

‘महाबीज’ अधिकारी/कर्मचाऱ्यांना सातवा वेतन व इतर प्रलंबित मागण्यांचा प्रस्ताव ‘महाबीज’ संचालक मंडळाने मान्यता देऊनही केवळ शासनाचे वित्त विभागात प्रलंबित असल्यामुळे हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. पर्यायाने बीजोत्पादकांचे कच्चे बियाणे स्वीकारणे, बियाणे प्रक्रिया करणे, बीज परीक्षण अहवाल वेळेत प्राप्त करणे, बियाणे पॅकिंग करणे, बियाणे पुरवठा करणे इत्यादी कामांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकऱ्यांना खरीप-२०२१ हंगामात लागणाऱ्या बियाणे उपलब्धतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मागील ४४ वर्षांपासून सेवेत असलेल्या ‘महाबीज’चा अत्यावश्यक सेवेत समावेश केलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना लागणाऱ्या एकूण बियाणेवाटपामध्ये जवळपास ५० टक्के वाटा एकट्या ‘महाबीज’चा आहे. राज्यातील शेतकऱ्यांना रास्त दरात व वेळेत बियाणे पुरविण्याचे कार्य ‘महाबीज’मार्फत होत आहे. यामध्ये शेतकरी भागधारक, महाबीज विक्रेता, कृषी विभाग व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फार मोठा वाटा आहे.

अपुरे मनुष्यबळ उपलब्ध असूनही आणि संपूर्ण जगात कोविड-१९ या महामारीचा प्रादुर्भाव असताना सुद्धा ‘महाबीज’
कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा दिली. बीज प्रक्रिया केंद्र, जिल्हा व विभागीय कार्यालये, तसेच मुख्यालय सतत सुरू ठेवल्यामुळे गेल्या खरीप-२०२० हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे उपलब्ध होऊ शकले होते. ‘महाबीज’ ही स्वायत्त संस्था असल्यामुळे सातवा वेतन आयोग व इतर मागण्या लागू करण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. 

शासनाच्या तिजोरीवर कुठलाही आर्थिक भुर्दंड पडणार नाही. कर्मचाऱ्यांच्या मागण्या बरेच वर्षांपासून शासनाच्या वित्त विभागात प्रलंबित आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सात डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. शासनाने संपकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन त्या सोडवाव्यात, अशी मागणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निळोबा ढोरे, उपाध्यक्ष श्‍यामजी दिवे, सचिव विजय अस्वार या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संघटनेने केली आहे.

मागण्या मान्य करण्याची आमदार सावरकरांचीही शासनाकडे मागणी शासनाने कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्यास मान्यता द्यावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी कृषीमंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. ‘महाबीज’ने स्थापनेपासून आजतागायत ४४ वर्षात केंद्र शासनाकडून १७ वेळा राष्ट्रीय उत्पादकता पारितोषिकाने सन्मानित झाली आहे. संस्था भरभराटीस असण्यास भागधारक, अधिकारी, कर्मचारी व कामगार यांचा असलेला सिंहाचा वाटा नजरेआड करता येत नाही. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपल्या हक्कापासून वंचित ठेवू नये, असेही म्हटले आहे.

 


इतर बातम्या
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा...अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना...
तूर विक्रीसाठी ३९८० शेतकऱ्यांची नोंदणीपरभणी ः यंदाच्या खरीप हंगामात (२०२०-२१) आधारभूत...
लातूर येथे बुधवारी जवस पीक प्रात्यक्षिकपरभणी ः लातूर येथील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र...
कृषी यंत्रणेला तत्पर करणार ः धीरजकुमारऔरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील कृषी विस्तार व...
कृषी विद्यापीठ तंत्रज्ञानाचा वापर करा...नाशिक : शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने कृषी...
नगरमध्ये कावळे ‘बर्ड फ्लू’ बाधितनगर ः श्रीगोंदा तालक्यातील भानगाव शिवारात मृत...
नाशिकमध्ये ‘बर्ड फ्लू’च्या देखरेखीसाठी...नाशिक : राज्यातील विविध भागांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा...
गोसेखुर्दच्या कामात हयगय नको : नितीन...नागपूर : तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोटूनही...
ट्रॅक्टर मोर्चाबाबत आज सर्वोच्च...नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत...
पावसमधील आंब्याच्या तीन बागांमध्ये...रत्नागिरी : ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांमध्ये...
ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड...
कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता....
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (...
कृषी आयुक्‍त थेट बांधावर औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा...
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
समविचारी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संघटन...नागपूर ः शेती प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी...
कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम करणारे :...नागपूर : केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि...
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान...माळेगाव, बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट...
कोरोना लसीकरण क्रांतिकारक पाऊल : ...मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक...
सातारा जिल्ह्यात रब्बीची ९५ टक्के...सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची कामे...