माजगाव, पडळ येथे कृषी पंपाची वीज तोडली

थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीकाठच्या माजगाव व पडळ येथील २३ शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
At Mazgaon, Padal The power of the agricultural pump was cut off
At Mazgaon, Padal The power of the agricultural pump was cut off

माजगाव, जि कोल्हापूर ः थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीकाठच्या माजगाव व पडळ येथील २३ शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करून उन्हाळ्यात पाटबंधारे विभागाने धडक कारवाई केल्यामुळे शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.  तालुक्यातील माजगावसह, पडळ, सातार्डे, माळवाडी, बाजारभोगाव, वाळोली, पोहाळे बोरगाव, साळवाडी आदी गावांतील पाटबंधारे विभागाची सुमारे ९ लाख ४० हजार रुपये पाणीपट्टी थकीत आहे. थकीत पाणीपट्टी भरणेबाबत पाटबंधारे विभागाने वेळोवेळी शेतकऱ्यांना लेखी सूचना देऊनही शेतकरी पाणीपट्टी भरण्यासाठी टाळाटाळ करत होते. काही कृषी पंपधारकांनी पाणीपट्टी भरली आहे, पण इतर शेतकरी पाणीपट्टी भरण्यासाठी येत नाहीत. यामुळे वसुलीच्या हेतूने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने २३ शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित केला. महापूर, रासायनिक खतांचे गगनाला भिडलेले दर तसेच डिझेल दरवाढीमुळे मशागतीचा वाढलेल्या खर्चामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असतानाच पाटबंधारे विभागाच्या कारवाईमुळे शेतकरी हबकून गेला आहे. यावेळी पंचगंगा पाटबंधारे उपविभागाचे सहायक अभियंता संदीप दावणे, इमारत शाखा अभियंता पी. एम. पाटील, दप्तर कारकून एस. एस. सावर्डेकर, वायरमन प्रमोद पाटील, अमोल भोमकर, सरदार जगताप उपस्थित होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com