क्रांती कारखान्याचा ऊस बेण्यासाठी ‘माझी नर्सरी-माझी लागण’ प्रयोग

क्रांतिअग्रणी कारखान्याच्या ‘माझी नर्सरी-माझी लागण’ या अभियानातून नर्सरी तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होऊन एकरी उत्पादनात देखील वाढ होण्यास मदत होईल. - अरुण लाड, चेअरमन, क्रांती कारखाना, कुंडल (जि. सांगली)
cane planting
cane planting

सांगली : शेतकऱ्यांना दर्जेदार ऊस बेणे मिळाले तरच उत्पादन चांगले येते. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात ऊस बेणे तयार केले तर खर्चात देखील बचत होण्यास मदत होईल, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कुंडल (ता. पलूस) येथील क्रांती साखर कारखान्याने ‘माझी नर्सरी-माझी लागण’ हा प्रयोग गेल्यावर्षीपासून सुरू केला. हा प्रयोग यशस्वी झाल्याने यंदाच्या हंगामात सुमारे ४५ एकरांवर हा प्रयोग सुरू केला आहे. क्रांती साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी विविध प्रयोग करत आहे. यामध्ये ऊस विकास योजना महत्त्वाचा दुवा आहे. एकरी शंभर टन उत्पादन कसे घेता येईल याचे प्रयोग शेतकऱ्यांच्या बांधावर घेतले जाते. यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले जाते. गेल्यावर्षी कारखान्याने आपल्या शेताच्या बांधावरच उसाची नर्सरी करण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर सुमारे २७ एकरांवर हा प्रयोग करण्यात आला.यंदापासून कारखान्याने अनुदानही जाहीर केले आहे. जे शेतकरी वाफ्यावर ‘माझी नर्सरी-माझी लागण’ या अभियानातून उसाची लागवड करतील त्या शेतकऱ्यांना कारखान्यामार्फत ‘व्हीएसआय’कडील ६ लिटर जिवाणू औषध १००% अनुदानावर देण्यात येणार आहेत. कारखान्याने हंगाम २०२०-२१ साठी कारखान्यामार्फत विविध सोयी सुविधा व रोख रकमेचे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. योजनांची प्रभावी अंमलबजावणी व शेतकऱ्यांच्या सहभागामुळे कार्यक्षेत्रातील सरासरी एकरी उत्पादन ४६ टनापर्यंत पोहचले आहे. ऊस उत्पादनवाढीबरोबरच उसाचा उत्पादन खर्च कमी करणे, जमिनीची सुपीकता वाढविणे यासाठीही कारखान्याकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. 

खर्चातही बचत  ऊस लागणीमध्ये बेण्याऐवजी प्लॅस्टिक टड्ढेमधील रोपांचा वापर केल्यामुळे उत्पादनात एकरी ८ ते १० टनांची वाढ होत असल्यामुळे कारखान्यामार्फत दरवर्षी सुमारे ५० लाख रोपे उधारीने शेतकऱ्यांना पुरवठा केली जातात. रोपे व वाहतूक यासाठी एकरी सुमारे १२ हजार रुपये खर्च येतो. प्रति रोपात १.२० रुपये, वाहतूक खर्चात प्रति रोप ९० पैसे अशी बचत होते.

अशी आहे ही पद्धत एक एकर क्षेत्राची रोपे तयार करणेसाठी सुमारे ४०० चौ.फूट इतकी कमी जागा लागते. ही जागा शेतकऱ्यांच्या घराशेजारी सुध्दा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे या पद्धतीने रोपे करणे त्रासाचेदायक होत नाही. रोपे तयार करण्यासाठी लागणारे प्रमाणित बियाणे व मार्गदर्शन कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत केल्यामुळे हा प्रयोग यशस्वीपणे राबविता येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com