‘एमसीडीसी’ शेतकरी कंपन्या स्थापन करणार

‘एमसीडीसी’ शेतकरी कंपन्या स्थापन करणार
‘एमसीडीसी’ शेतकरी कंपन्या स्थापन करणार

पुणे : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ नाबार्डच्या सहकार्याने शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणार आहे. याबाबतचा सामंजस्‍य करार नुकताच नाबार्ड आणि महामंडळामध्ये झाला आहे. प्राथमिक स्तरावर हा प्रकल्प पुणे, नगर, अमरावती, भंडारा, गोंदिया या पाच जिल्ह्यांमध्ये राबवला जाणार असून, आगामी आर्थिक वर्षात (२०१९-२०२०) मध्ये संपूर्ण राज्यात राबविण्याचा महामंडळाचा प्रयत्न असल्याचे महामंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे यांनी सांगितले.   याबाबत बोलताना आकरे म्हणाले, ‘‘सहकार विकास महामंडलाद्वारे पहिल्यांदाच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या जात आहे. या कंपन्यांना उद्योग उभारणीसाठी नाबार्डची मदत मिळण्यासाठी सोयीस्कर व्हावे, यासाठी नाबार्डच्या सहकार्यानेच कंपन्या स्थापन केल्या जाणार आहेत. प्रकल्पातून किमान १०० भागधारक असलेल्या शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी, प्रशिक्षण, व्यवसाय प्रस्ताव तयार करणे, बाजार जोडणीसाठी मार्गदर्शन करणे इत्यादी बाबी राबवल्या जाणार  आहे.’’ हा प्रकल्प सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, सामंजस्य कराराच्या वेळी नाबार्डच्या उपमहाव्यवस्थापक डॉ उशामनी पी, सहायक सरव्यस्थापक सतिश कांबळे, सहकार विकास महामंडळाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रतीक पोखरकर, विजय गोफणे, सुनील जाधव, जालिंदर बदडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com