भूगर्भातील पाण्याच्या स्रोतांचे मोजमाप सुरू ः गजेंद्रसिंह शेखावत

भूगर्भातील पाण्याच्या स्रोतांचे मोजमाप सुरू ः गजेंद्रसिंह शेखावत
भूगर्भातील पाण्याच्या स्रोतांचे मोजमाप सुरू ः गजेंद्रसिंह शेखावत

पुणे ः देशातील पाण्याच्या स्रोतांचे जलशक्ती मंत्रालयाने मोजमाप करण्याचे काम सुरू केले आहे. त्या माध्यमातून अस्तित्वात नसलेले स्रोत समोर येत आहेत. येत्या दोन वर्षांत भूगर्भातील पाण्याचा अभ्यास करून पूर्ण स्रोतांचे मोजमाप केले जाणार आहे, अशी माहिती जलशक्ती मंत्रालयाचे केंद्रीय जलमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिली.

जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्पांतर्गत पुण्यात ‘शाश्‍वत पाणी व्यवस्थापन’ या विषयावरील तीनदिवसीय दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे बुधवारी (ता. ६) पुण्यातील नगर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये उद्‍घाटन झाले. या परिषदेच्या उद्‍धाटन प्रसंगी श्री. शेखावत बोलत होते.

जलशक्ती मंत्रालयाचे सचिव यू. पी. सिंग, जलसंसाधन विकासचे प्रधान सचिव आय. एस. चहाल, राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाचे वरिष्ठ सहआयुक्त राकेश कश्यप, जलशक्ती मंत्रालयाचे प्रकल्प समन्वयक अखील कुमार, मुंबईतील ऑस्ट्रेलियाचे राजदूत टोनी हुबेर, दीपक कुमार, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे महासंचालक एन. व्ही. शिंदे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता वी. जी. रजपूत, राजेंद्र मोहिते, जल विज्ञान प्रकल्पाचे मुख्य अभियंता श. द. भगत, खासदार वंदना चव्हाण आदी उपस्थित होते. इंडिया डब्ल्यूडब्ल्यूआरएस डाटा एन्ट्री, कुकडी इरिगेशन रोटेशन या मोबाईल अॅपचे उद्‍घाटन आणि ‘जलदूत’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  

श्री. शेखावत म्हणाले, की राज्यात उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या क्षमतेवर काम करावे लागणार आहे. पाण्याविषयी नागरिकांमध्ये चर्चा वाढत आहे. आगामी काळात आणखी वाढणार असून, त्याचे स्वरूप आणखी उग्र होणार आहे. त्यामुळे सरकारने २०२४ पर्यंत घराघरांत पिण्याचे पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पंतप्रधानानी जे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याची चर्चा देशादेशांत होत आहे. त्यांनी ते उद्दिष्ट २०३० पर्यंत ठेवले असले, तरी भारत सरकारने ते उद्दिष्ट २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी सर्व विभाग काम करीत आहे. शेतीखालील पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचनाला महत्त्व दिले आहे. त्यावर काम प्राधान्याने सुरू केले आहे. त्यामुळे पाण्याची मोठी बचत होत होऊन उत्पादन घेण्याचे आवाहन केले जात आहे.

यावेळी सचिव यू. पी सिंग आणि आॅस्ट्रेलियन राजदूत टोनी हुबेर यांची भाषणे झाली. कार्यक्रमात प्रधान सचिव आय. एस. चहाल यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष खलील अन्सारी यांनी आभार मानले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com