अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार उपाययोजना

पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली अन्नद्रव्ये वेळीच उपलब्ध न झाल्यास अंतर्गत शरीरक्रियांवर परिणाम होतो. त्यामुळे वाढीवर तसेच उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
Remedies for nutrient deficiency of crops
Remedies for nutrient deficiency of crops

पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली अन्नद्रव्ये वेळीच उपलब्ध न झाल्यास अंतर्गत शरीरक्रियांवर परिणाम होतो. त्यामुळे वाढीवर तसेच उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. पिकाच्या उत्तम वाढीसाठी लागणाऱ्या रासायनिक मूलद्रव्यांना आवश्यक अन्नद्रव्य असे म्हणतात. त्यांची वेळीच उपलब्धता न झाल्यास पिकांच्या अंतर्गत शरीरक्रिया व्यवस्थित चालत नाहीत. अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे सर्वसाधारणपणे अन्नद्रव्यांच्या स्थलांतराप्रमाणे जुन्या किंवा नवीन पानावर दिसतात. आवश्यक अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास पिकांची सामान्य वाढ होत नाही. पिकांची पाने पिवळी पडतात. पानावर तपकिरी, करडे डाग पडतात. पानाचा आकार लहान होतो, वाढ खुंटते, रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी उत्पादनात घट येते. अन्नद्रव्ये  पिकाला नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक ही दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळून १६ अन्नद्रव्ये लागतात.  पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्यांची एकूण गरज कमी जास्त असते. विद्राव्य खतांचा वेगवेगळ्या ग्रेडस् बाजारात उपलब्ध आहेत. त्यामध्ये १९:१९:१९, १२:६१:००, ००:५२:३४, १३:००:४५, ००:००:५०, १३:४०:१३, १८:४६:०० ही सर्व खते पाण्यात संपूर्णपणे विरघळतात. त्यांचा वापर ठिबकद्वारे अथवा फवारणीद्वारे करता येतो. यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचाही वापर करता येतो. ही सर्व खते पाण्यामध्ये गरजेप्रमाणे विरघळवून घ्यावीत. 

तीव्रता 

  • पिकामध्ये असलेले कमतरतेच्या प्रमाणानुसार खतांची तीव्रता ठरवावी. त्यासाठी माती किंवा देठ परीक्षण अहवालाची मदत घ्यावी. 
  • पाण्यामध्ये विरघळवून देताना विद्राव्य खताची तीव्रता महत्त्वाची असते. सर्वसामान्यपणे सुरुवातीच्या वाढीच्या काळात अर्धा टक्का, फुलोऱ्यापूर्वी १ टक्का व फुलोऱ्यानंतर २ टक्के तीव्रतेचे द्रावण एकरी २०० लिटर प्रमाणे पिकावर फवारावे. (१ टक्का म्हणजे १ किलो खत प्रति १०० लिटर पाणी.) 
  • सध्या पिके वाढीच्या विविध अवस्थेत आहेत. पिकामधील स्वच्छता, कोळपणी किंवा खुरपणीनंतरच विविध खतांचा वापर करावा. त्यानुसार सुरुवातीस १९:१९:१९ विद्राव्य खत १ टक्का, फुलोऱ्यापूर्वी १२:६१:० किंवा ०:५२:३४  हे खत १ टक्का आणि फुलोऱ्यानंतर १३:००:४५ किंवा ००:००:५० फवारणीद्वारे २ टक्के प्रमाणात वापरावे. पिकाची जोमदार वाढ होते. 
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांची (उदा. जस्त, लोह, बोरॉन इ.) ०.५ टक्के तीव्रतेची फवारणी वरील फवारणीनंतर दोन दिवसांनी करावी. त्यामुळे उत्पादनाची प्रत सुधारून बाजारभाव अधिक मिळण्यास मदत होते. 
  • फायदे 

  • पिकाला संतुलित प्रमाणात अन्नद्रव्ये मिळाल्यास त्यांची रोग, किडी व पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. 
  • फुल व फळगळ थांबून फळधारणा चांगली होते. फळांची संख्या, वजन, आकार व प्रत यात लक्षणीय वाढ होते. 
  • लक्षणानुसार पिकात अन्नद्रव्यांची कमतरता आढळल्यास आपत्कालीन उपाय म्हणून फवारणीद्वारे त्यांची पूर्तता करावी. 
  • विद्राव्य खतामध्ये फक्त युरियाचा विचार न करता, दोन किंवा तीन अन्नघटक असलेली व चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यासारखी मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये खतांचा वापर करावा. 
  • विद्राव्य खते प्रमाणात (०.५ ते १ टक्का) पाण्यात मिसळून स्वच्छ पंपाद्वारे फवारणी सकाळी ११ पर्यंत व संध्याकाळी ४ वाजेनंतर फवारणी केल्यास जास्त उपयुक्त ठरतात.  द्रावणांत स्टीकर १ मिली प्रति लिटर प्रमाणे वापरावे. 
  • पीक वाढीची अवस्था व फवारणी द्रावणाची तीव्रता विचारात घेऊनच पाण्याचे प्रमाण कमी जास्त करावे.
  • संपर्क- विलास सातपुते, ९९२३५७५६८५ (सहाय्यक प्राध्यापक, मृद विज्ञान व रसायन शास्त्र विभाग, समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा, जि. बुलडाणा.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com