पेठ तालुक्यात यांत्रिक पद्धतीने भात लागवडीला प्रोत्साहन

पेठ तालुक्यात यांत्रिक पद्धतीने भात लागवडीला प्रोत्साहन
पेठ तालुक्यात यांत्रिक पद्धतीने भात लागवडीला प्रोत्साहन

नाशिक : जिल्ह्यातील आदिवासी भागात पेठ तालुक्यात कृषी विभागातर्फे यांत्रिक पद्धतीने भात लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. हा भात लागवड प्रात्यक्षिक कार्यक्रम मंगळवार (ता. २३) पासून सुरू झाला आहे.  तालुक्यातील हरणगाव येथे भात लागवड प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. याठिकाणी यांत्रिक पद्धतीने लागवड व पारंपरिक भात लागवड अशा दोन पद्धतीचे प्लॉट तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे भात उत्पादकांना दोन्ही क्षेत्रावरील फरक अनुभवायला मिळणार आहे. मागील वर्षी केवळ एक एकर क्षेत्रावर केलेली लागवड चालू वर्षी ५० एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे मजूरटंचाई व वेळ यात बचत होणार आहे. हरणगाव येथील भात उत्पादक शेतकऱ्याने मागील वर्षी भात लागवड यंत्र खरेदी केले होते. मागील वर्षी केवळ एक एकर क्षेत्रावर लागवड झाली. त्यास अधिक फुटवे आल्याने चांगले परिणाम दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांना या पद्धतीबाबत प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. याठिकाणी महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यासाठी तालुका कृषी विभागाकडून महिला ५ शेतीशाळा वर्ग झाले असून क्रॉपसॅपअंतर्गत दर १५ दिवसांनी दोन्ही प्लॉटमधील तुलनात्मक निरीक्षणे नोंदविण्यात आले आहेत.  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृवही अधिकारी संजय सूर्यवंशी यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभत आहे. या वेळी तालुका कृषी अधिकारी सी. के. ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी डॉ. श्रीरंग वाघ, मंडळ कृषी अधिकारी एम. बी. महाजन, कार्यालयीन कृषी अधिकारी संजय पवार यांसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्कालीन कृषी अधिकारी शिलानाथ पवार यांनी विशेष पुढाकार घेतला होता.  यांत्रिक पद्धतीची लागवड फायदेशीर  रोप वाटिकेमध्ये रोपे तयार करून रोपे यंत्राद्वारे लागवड करण्यात येतात. भात क्षेत्रात पाऊस पडायला लागला की, एकाच वेळी लागवड करण्यास सुरवात केली जाते. मजूरटंचाई, वेळ व खर्चात बचत होते. एक एकर लागवड दीड तासात होते. त्यासाठी १ लिटर डिझेल लागते. लागवडीनंतर रोपे जास्त फुटवे करतात. वाढ लवकर होऊन रोग, किडीला कमी बळी पडतात. आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन व खत व्यवस्थापन सुलभ करता येते. तसेच उत्पन्नात दीड पटीपेक्षा जास्त वाढ होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com