विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम), अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपलब्धता, प्रशिक्षण आदी पूर्वतयारी झाली असून निष्पक्ष, निर्भय वातावरणात पारदर्शी पद्धतीने निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी दिली.

ईव्हीएम पूर्णत: सुरक्षित, सक्षम आणि दोषविरहित असून कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाद्वारे त्याची सुरक्षितता भेदणे अशक्य आहे. ईव्हीएमला सुरक्षिततेचा ‘हाएस्ट सिक्युरिटी प्रोटोकॉल’ आहे. विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये या यंत्रणेला योग्य ठरविण्यात आले आहे. तरीही या यंत्रणेबद्दल अप्रचार आणि अफवा पसरविल्या जात असून त्यावर मतदारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही सिंग यांनी केले.

राज्य विधानसभेची निवडणूक पुढील महिन्यात अपेक्षित आहे. भारत निवडणूक आयोगाकडून पुढील आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बलदेव सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणूक तयारीची माहिती दिली. मतदारयाद्यांच्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आल्यानंतर ३१ ऑगस्ट २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात आली. असे असले तरी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसांपूर्वी १० दिवस आधी मतदार नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे अजूनही नोंदणी करू न शकलेल्या मतदारांना आपले नाव नोंदण्याची संधी आहे, असे सिंग म्हणाले.

राज्यात लोकसभा निवडणुकीला ९५ हजार ४७३ मतदान केंद्रे होती. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राची निश्चिती करण्यात येत असून लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला मतदान केंद्रांची संख्या ७०० ते ८०० ने वाढण्याची शक्यता आहे. आयोगाच्या सुलभ निवडणुका या घोषवाक्यानुसार अपंग मतदारांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिल्या किंवा त्यापेक्षा वरच्या मजल्यावर असलेल्या मतदान केंद्रांना तळमजल्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com