Agriculture news in Marathi, Mechanism ready for a fair election | Agrowon

निष्पक्ष निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

अकोला ः विधानसभा निवडणुकीच्‍या अनुषंगाने जिल्‍हा प्रशासनाने निवडणूक पूर्व तयारी केली असून अकोला जिल्ह्यात निर्भय, निष्पक्ष निवडणूक घेण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. शनिवारी (ता. २१) सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

अकोला ः विधानसभा निवडणुकीच्‍या अनुषंगाने जिल्‍हा प्रशासनाने निवडणूक पूर्व तयारी केली असून अकोला जिल्ह्यात निर्भय, निष्पक्ष निवडणूक घेण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. शनिवारी (ता. २१) सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

या वेळी जिल्हाधिकारी पापळकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश खवले, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहा सराफ, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, नीलेश अपार, अतुल दोड तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, निवडणूक मुक्‍त, निर्भय व शांततामय वातावरणात पार पाडण्‍यासाठी मतदारांमध्‍ये जनजागृतीपर (स्‍वीप) कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात येत आहे. कोणत्‍याही अपप्रचाराला किंवा आमिषाला बळी न पडता स्‍वतःच्‍या विवेक बुद्धीने मतदान करावे. जिल्ह्यातील शस्‍त्र परवानाधारकांना त्‍यांच्याकडील शस्‍त्र जवळच्‍या पोलिस ठाण्यामध्‍ये जमा करण्याबाबत निर्देश देण्‍यात आले असून कायदा व सुव्‍यवस्‍थेच्‍या अनुषंगाने पोलिस प्रशासनामार्फत पोलिस बल तैनात ठेवण्‍यात आले आहे. अवैध दारू भट्टी व अवैध धंदे याबाबत धाडसत्राव्‍दारे प्रतिबंधात्‍मक कार्यवाही करण्‍यात येत आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक गावकर यांनी दिली. 

नागरिकांनासुद्धा कोणतीही आक्षेपार्ह बाब निदर्शनास आल्‍यास त्‍याकरिता CVIGIL अॅपव्‍दारे तक्रार करण्‍याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यास्‍तरावर भरारी पथक, व्हिडिओ पाहणी पथक, स्थिर पथक, खर्च निरीक्षण पथक आदी स्‍थापन करण्‍यात आलेले आहेत. निवडणूक आदर्श आचारसंहितेच्‍या अनुषंगाने निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्‍या सूचनेनुसार शासकीय, निमशासकीय कार्यालय आणि परिसरातून भिंतीवरील लेखन, पोस्‍टर्स, कट आऊटस, होर्डीग्‍स, बॅनर्स, झेंडे इत्‍यादी त्‍वरीत काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...